pilane1.jpg 
पुणे

क्वारंटाइन नव्हे स्कूलटाइम...! शाळेच्या भिंतींवर अवतरले इंद्रधनू

किशोर कुदळे

वाल्हे (पुणे) : राज्यभरात सध्या कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे गड्या आपला गाव बरा असे म्हणत मुंबई, पुणे या भागातून अनेक चाकरमनी आपल्या मूळ गावाकडे येत आहेत. परंतु, कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी अशा चाकरमान्यांचे खबरदारीचा उपाय म्हणून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण करण्यात येत आहे. मात्र, याठिकाणी अनेकजण गावावर उपकार केल्यासारखे राहतात तर काहीजण यातही समाजाला काहीतरी देण्याची संधी शोधत असतात. अशीच संधी लपतळवाडी (ता.पुरंदर) येथील पिलाणे परिवाराने साधली आहे.

मुंबईवरून आल्यानंतर विलगीकरण झालेल्या या परिवाराने शाळेची रंगरंगोटी करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लपतळवाडी (ता. पुरंदर) येथे संतोष तुकाराम पिलाणे व त्यांचे बंधू हभप राजेंद्र महाराज पिलाणे हे मुंबईहून आपल्या मूळ गावी आले आहेत.
आपल्यामुळे गावकऱ्यांना अनवधानाने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या कुटुंबाचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विलगीकरण करून
घेतले आहे.

आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील १४ दिवसांच्या वास्तव्यात ऋणातून मुक्त होण्याचा निश्चय केला.
त्यानुसार त्यांच्या कुटुंबातील विलास पिलाणे, संदेश पिलाणे, संतोष पिलाणे, राजेंद्र पिलाणे यांनी शाळेच्या रंगकामास सुरुवात तर केलीच, शिवाय शाळेच्या परिसराची स्वच्छता, झाडाची निगा आदी कामे देखील त्यांचे सगळे कुटुंब मनापासून करत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, लपतळवाडी ग्रामस्थांनीं त्यांना रंग
उपलब्ध करून दिला आहे. विलगीकरनातील त्यांच्या या कामाचे कौतुक सरपंच वैशाली पिलाणे, उपसरपंच अलका कदम व माजी उपसरपंच प्रा. कुंडलिक कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT