Nachni Farming sakal
पुणे

Nachni Farming: पिंपरवाडी होणार जुन्नर तालुक्यातील पहिले नाचणी ग्राम

Sustainable Farming: जुन्नर तालुक्यातील दुर्गम पिंपरवाडी हे पहिले नाचणी ग्राम ठरणार असून, १७ प्रकारच्या नाचणीच्या बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पांतर्गत होत असून शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दत्ता म्हसकर ः सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : दुर्गम आदिवासी भागातील पिंपरवाडी ता.जुन्नर तालुक्यातील पहिले नाचणी ग्राम होणार आहे. महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम साकारत असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील नाचणीचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे.शेतकऱ्यांना नाचणी लागवडीसाठी संस्थेच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात आल्याने नाचणी लागवडी खालील क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील पठारावरील पिंपरवाडी गावात अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून गावातील सतरा शेतकऱ्यांना नाचणीच्या दसर बेंद्री,पितर बेंद्री,दिवाळी बेंद्री,शित मुटकी,दापोली, नागली लेट,जाबड स्थानिक,ढवळ पेरी,शिनपडी, गिरवी आदी १७ प्रकारच्या जातीच्या वाणांचे वाटप करण्यात आले.मान्सूनच्या पूर्वसंध्येला सतरा शेतकऱ्यांनी ह्या बियाण्यांची पेरणी केली.आता बियाणे उतरून आले आहेत.त्यांची उगवण क्षमता देखील चांगली आहे.

या उपक्रमात गावातीलरामदास घोडे,मुकुंद घोडे, शंकर डामसे, सखाराम घोडे,वसंत घोडे,विश्वनाथ डगळे,गोविंद घोडे,सुरेखा डगळे,जयश्री घोडे,बाळू घोडे,किसन डामसे,धोंडू डगळे,उल्हास घोडे,नावजी ढेंगळे,गोविंद ढेंगळे,गणपत घोडे,चंद्रकांत डगळे यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.

जुन्नर तालुक्यात प्रथमच एकाच गावात १७ प्रकारच्या नाचणीच्या बियाण्यांची पेरणी झाल्याने भविष्यात पिंपरवाडी गावामध्ये नाचणीची १७ प्रकारच्या बियाणे बँक तयार होणार आहे.पिंपरवाडी गावात महाराष्ट्र फाउंडेशन पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील तीन वर्षे नाचणीच्या विषयांवर काम होणार आहे.यामध्ये नाचणी रोपवाटिका तयार करणे, नाचणीचे बियाणे संकलन करणे,शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत नाचणी लागवडीसाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.

"आहरात नाचणीचे अनेक फायदे आहेत. नाचणीमध्ये जीवनसत्वे,खनिजे फायबर,मुबलक प्रमाणात आढळतात. नाचणी अनेक आजारांना दूर ठेवते.लठ्ठपणा,ताण- तणाव,हृदयविकार,मधुमेह कमी होण्यास नाचणीची मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाचणी खूप फायदेशीर आहे.नाचणी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते.वजन कमी करण्यासाठी देखील आहारात नाचणीचा समावेश केला जातो. नाचणीमुळे लठ्ठपणा नियंत्रणात येतो. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वाधिक असते यामुळे हाडे मजबूत होतात."

गणपत घोडे - ग्राम समन्वयक(पिंपरवाडी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपायुक्तच बनल्या मालकीणबाई? मसाज, भांडीकुंडी अन् धमक्या… व्हिडिओ व्हायरल! सफाई कामगार महिलेचे धक्कादायक आरोप

समलैंगिक संबंध, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; CAची आत्महत्या; 22 वर्षीय तरुणीसह दोघांना अटक

शिक्षक मुंबईत! 'आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे हाल; शाळा बंदच्या निर्णयावर ठाम'; राज्य सरकारकडून निघाला नाही तोडगा

मंदिराचा पदाधिकारी चर्चमध्ये प्रार्थनेला जायचा; तिरुपती देवस्थानने केली मोठी कारवाई

PMC Development : रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार; कृती पथकाची निर्मिती; कोंडी फोडण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT