lockdown. 
पुणे

पुण्यातील या बाजारात कोरोनाची एंट्री, पुढचे आठ दिवस बंदचा निर्णय

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : शिरूर कृषी उप्तन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता.शिरूर) येथील उपबाजारातील तीन आडते व्यापा-यांना कोरोनाची लागण झाल्याने पुढील आठ दिवस पिंपळे उपबाजार तातडीने बंद करण्यात आल्याची माहिती सभापती शंकर जांभळकर यांनी दिली.

शिरुर तालुक्यात कोरोनाने डोके वर काढून शिक्रापूर, सणसवाडीनंतर शिरुर शहर, रांजणगाव ते तालुक्यातील सुमारे पंधरा गावांमध्ये कोरोनाने आपले पाय पसरलेले आहेत. शिक्रापुरात गेल्या तीन दिवसात चार रुग्ण नव्याने आढळल्याने शिक्रापूर परिसर डेंजर झोन झाले आहेत. त्यातच आता शिक्रापूरपासून केवळ चार किलोमीटरवर असलेल्या पिंपळे जगताप उपबाजारात तीन आडते आज कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने करंदी, चौफुला, वाजेवाडी, केंदूर, जातेगाव खुर्द परिसर हबकला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या तीनपैकी एक रुग्ण हा जातेगाव बुद्रुक येथील असल्याने जातेगावातही कोरोनाची एंट्री झाल्याने पुढील तीन दिवस जातेगाव संपूर्ण बंद ठेवण्यात आल्याची माहिती सरपंच मंगल इंगवले यांनी दिली. दरम्यान, पिंपळे जगताप येथील कोरोनाबाधित तिघांच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना बाजार समिती आवारातील रुममध्येच होम क्नवारंटाइन केले असून, या सर्वांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठविल्याचेही जांभळकर यांनी सांगितले. 

आज सापडलेल्या तीन रुग्णांच्या पार्श्वभूमिवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय पथकाने तातडीने पिंपळे उपबाजारात पाहणी केली. तसेच, संपूर्ण बाजार समितीचे सॅनिटायझेशन करून घेतले. स्वत: शंकर जांभळकर, सचिव अनिल ढोकले तसेच इतर कर्मचा-यांनी याबाबत दक्षता घेऊन आवारातील सर्व गाड्या बाहेर काढणे, प्रत्येक गाळा व परिसरात स्वच्छतेची उपाययोजना तात्काळ सुरू करून पुढील आठ दिवस संपूर्ण दैनंदिन बाजार संपूर्णपणे बंद ठेवण्याची माहिती विविध पर्यायांनी प्रसारीत केली. 

शेतक-यांसाठी उत्तम पर्याय असलेला पिंपळे-जगताप उपबाजार आठ दिवस बंद राहणे तालुक्यासाठी गंभीर आहे. पुढील आठ दिवसात जे-जे काही करता येईल, ते मी सर्व संचालकांच्या सुचनांचा स्विकार करून करणार आहे. मात्र, येत्या १४ तारखेला पिंपळे-जगताप उपबाजार काहीही करुन सुरूच करणार असल्याचा दृढनिश्चय सभापती शंकर जांभळकर यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT