Pimpri Chinchwadkar's water issue
Pimpri Chinchwadkar's water issue 
पुणे

पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली

संदीप घिसे

पिंपरी, (पुणे)- पिंपरी चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. सध्या पवना धरणात 90 टक्‍के पाणीसाठा झाल्याने शहरवासियांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

पवना धरणाची एकूण क्षमता 10.68 टीएमसी आहे. तर 8.5 टीएमसी हा जिवंत साठा आहे. यापैकी पाच टीएमसी पाण्याचा वापर पिंपरी चिंचवड शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता होतो. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या 22 लाखांपेक्षा अधिक आहे. तर नळजोडांची संख्या एक लाख 41 हजार इतकी असून 490 एमएलडी पाण्याचा वापर शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता केला जातो.

पवना धरणातून पिंपरी चिंचवड शहरासह तळेगाव, देहूरोड, वाघोली प्रकल्प यांनाही पाणी पुरवठा होतो. तसेच शेतीसाठी देखील पवना नदीतील पाण्याचा उपयोग होतो. पावसाळ्यातील चार महिने पावसाचे पाणी पवना नदीतून घेतले जाते. उर्वरित आठ महिने पवना धरणातून पाणी सोडले जाते. या सर्व योजनांना दरमहा धरणातील दहा टक्‍के पाणीसाठा लागतो. सध्या धरण 90 टक्‍के भरले असल्याने पिंपरी चिंचवडकरांच्या वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली आहे.

गेल्या आठ दिवसापासून सध्या धरण परिसरात 20 ते 30 मिलिमीटर पाऊस पडत आहे. यामुळे धरण पाणीसाठ्यात दररोज किंचितशी वाढ होत आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास येत्या दोन-तीन दिवसात धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल, पवना धरणाचे शाखा अधिकारी ए.एम.गदवाल यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

मात्र, पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्याबाबत त्वरित निर्णय घेतला जाईल. पाणी सोडण्यापूर्वी चार तास अगोदर सर्व संबंधितांना कळविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT