Minister-Pimpari 
पुणे

'या' शहराला मंत्रिपदाचे 'दिवा'स्वप्नच!

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्यात सत्ता स्थापन करण्यास भारतीय जनता पक्षाने रविवारी (ता. 10) असमर्थता दर्शविल्याने शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण, सत्ता स्थापन करण्याचा दावा शिवसेना करण्याची शक्‍यता आहे आणि शहरातील तीनपैकी दोन आमदार भाजपचे आणि एक राष्ट्रवादीचा आहे. 

शहरातील चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अनुक्रमे लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे विजयी झाले आहेत. जगताप यांनी हॅटट्रिक साधली असून, त्यांना यापूर्वी विधानसभेचा दोन व विधान परिषदेचा एक वेळेचा अनुभव आहे. तसेच, लांडगे दुसऱ्यांदा सभागृहात पोचले आहेत. त्यामुळे जगताप वा लांडगे यांच्या रूपाने शहराला मंत्रिपद मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या होत्या.

शिवाय, विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी दोघांनीही मुंबईत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे शहराला लाल दिवा मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले होते. मात्र, मुख्यमंत्रिपद व खाते वाटपावरून त्यांच्यात गेल्या पंधरा दिवसांपासून ओढाताण सुरू होती. अखेर तोडगा न निघाल्याने सत्ता स्थापन करण्यास भाजपने रविवारी असमर्थता दर्शवली. त्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, शहराला मंत्रिपद मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. 

गेल्या वर्षापासून चर्चा 

सहा महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत तत्कालिन पालकमंत्री गिरीश बापट विजयी होऊन संसदेत गेले. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळातील त्यांची जागा रिक्त झाली होती. त्यावर चिंचवडचे लक्ष्मण जगताप, भोसरीचे महेश लांडगे यांच्यासह मावळातील बाळा भेगडे यापैकी एकाची वर्णी लागणार याची चर्चा झाली. तिघेही मंत्रिपदासाठी इच्छुक होते.

अखेर भेगडे यांना राज्यमंत्रिपद मिळाले आणि शहराला मंत्रिपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, काही महिन्यांच्या कालावधीत विधानसभा निवडणूक झाली. त्यात मावळातून पराभूत झाल्याने भेगडे यांचा मंत्रिपदाचा पत्ता कट झाला आणि शहरातील जगताप व लांडगे यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. आता रविवारच्या घडामोडींनंतर त्यांच्या आशेवरही पाणी फिरले आहे. 

हॅटट्रिक साधूनही 'दिवा' नाही 

चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप यांनी हॅटट्रिक साधली आहे. शिवाय, विधान परिषद सदस्यत्वाचा त्यांना सहा वर्षांचा अनुभव आहे. म्हणजेच 16 वर्षांचा त्यांना विधीमंडळातील अनुभव आहे. तरीही त्यांना मंत्रिपदाची संधी मिळणार नाही, हे उघड सत्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: धोनीचं लखनौचं तिकीट झालंय बूक! LSG विरुद्ध मैदानात दिसण्याची शक्यता, पण कोणाच्या जागेवर खेळणार?

रणवीर सिंह साकारणार भगवान शिवांची भूमिका? अमीश त्रिपाठींच्या पुस्तकावरून बनणार मेगा फिल्म सीरिज

Pune IT Work From Home: पंतप्रधानांच्या आवाहनानंतर पुण्यातील आयटी क्षेत्रात हालचाल; ‘वर्क-फ्रॉम-होम’ला पुन्हा मागणी, कर्मचाऱ्यांना प्रवास ठरतोय त्रासदायक!

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गॅंगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोकांचे नाशिकमध्ये ATS कडून सर्च ऑपरेशन सुरू

बारामतीत पुन्हा विमान अपघात, रेडबर्डची अपघाताची परंपरा; DGCA घातलेली बंदी

SCROLL FOR NEXT