वासवानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी बाजारपेठ बंद
वासवानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी बाजारपेठ बंद 
पुणे

वासवानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी बाजारपेठ बंद

आशा साळवी

पिंपरी : जगप्रसिद्ध साधू वासवानी मिशनचे प्रमुख तथा आध्यात्मिक गुरू जे. पी. वासवानी यांच्या निधनामुळे पिंपरी बाजारपेठेतील सिंधी बांधवांनी आणि व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी एकदिवस बंद पाळला. मात्र, पूर्वसूचना व कल्पना नसल्याने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची भरपावसात तारांबळ उडाली.

पिंपरी कॅम्प ही शहरातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पिंपरी रेल्वे स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असून दिवसाला कोट्यवधी उलाढाल होते. या बाजारपेठेत कायमच वर्दळ सुरू असून खरेदीसाठी ग्राहकांची एकसारखी रेलचेल असते. मात्र, आज अचानक व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिल्याने नागरिक अचंबित होते. कुठहीली कल्पना नसल्याने ग्राहक नेहमीप्रमाणे खरेदी आले होते. कोण किराणा खरेदीसाठी तर, कोणी शाळेचा गणवेश, बॅग खरेदीसाठी आले होते. परंतु सगळीकडे शुकशुकाट पाहून नागरिक हैराण होते. भरपावसात तारांबळ उडाल्याने वैतागलेले. परंतु जेव्हा कारण समजले की, थोर समाजसुधारक, आध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्रित येऊन हजारो व्यापाऱ्यांनी एकदिवस बंद पाळला आहे, त्यावेळी ग्राहकांनीही श्रद्धांजलीपर शोक केला.

दरम्यान, सिंधी समाजाचे धार्मिक गुरू दादा वासवानी यांचे गुरुवारी (ता.12) सकाळी निधन झाले. दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कपडे, बॅग, किराणा भुसार, ज्वेलरी, मोबाईल शॉप, इलेक्‍ट्रॉनिक दुकाने, मिठाईवाले तसेच किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा कालरात्री निर्णय घेतला. भाजी मंडई व फुलबाजार वगळता पूर्ण बाजारपेठ शांत होती. गल्लीबोळातील दुकानेदेखील बंद होती. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी कॅम्पमध्ये चौका- चौकांमध्ये "दादा श्‍याम... वुई लव यु फोरइवर...' असे फ्लेक्‍स झळकत होते.

ऊर्मिला बालोजी म्हणाल्या, ""युनिफॉर्म खरेदीसाठी गेले होते. परंतु पाहते तर बाजारपेठ बंद. परंतु माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन बाजारपेठ बंद ठेवल्याचे समजल्यावर समाधान वाटले.

नागरिकांच्या मते
- किराणा खरेदीसाठी आलो होतो. ही बाजारपेठ कधीच बंद नसते. अचानक बंद असल्याने समजल्याने अचंबित झालो. मात्र, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंद आता हेलपाटा पडला तरी काही हरकत नाही.
- विलासकुमार पगारिया, नागरिक

बाजारपेठ बंद असल्याचे प्रत्यक्ष बाजारपेठेत गेल्यावर समजले. कुठलीच कल्पना नसल्याने भरपावसात शॉपींगला बाजारपेठेत गेले. मात्र, दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुकानेच बंद होती.
- प्रणाली छाजेड, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT