पुणे

रिंगरोडबाधितांची दिंडी

सकाळवृत्तसेवा

वाल्हेकरवाडी - पिंपरी चिंचवड येथील पेठ क्रमांक ३०, ३१ आणि ३३ मधून प्रस्तावित रिंगरोडला (एचसीएमटीआर) विरोध करण्यासाठी घरे वाचवा संघर्ष समितीने शुक्रवारी (ता. ३०) आकुर्डीतील प्राधिकरण कार्यालयावर पायी दिंडी काढून विरोध केला आहे. त्यावर पावसाळा संपेपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

‘घर हीच आमची पंढरी असून, पर्यायी मार्ग काढून आमची घरे वाचवा, सद्‌बुद्धी दे प्रशासनाला आमची घरे वाचू दे, पंढरीची वारी प्रशासनाच्या दारी, असा हरिनामाचा गजर करत टाळ मृदंगाच्या जयघोषात हा मोर्चा काढण्यात आला. बिजलीनगर येथील शिवनगरी गणेश मंदिरापासून गुरुद्वारा चौक मार्गे ही दिंडी नेण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक व व्यापारी सहभागी झाले. हातात पताका, टाळ, तुळस अशी दिंडीच कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आणली. सुरक्षारक्षकांनी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने सकाळी दहापासून भरपावसात लोक रस्त्यावरच विठूनामाचा गजर करत बसले. दिंडी मोर्चा कार्यालयाजवळ येताच कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले असल्याने आता प्रशासनानेच खाली येऊन आमचे निवेदन स्वीकारावे. आम्ही कार्यालयात जाणार नाही, असे रेखा भोळे यांनी सांगितले. या वेळी प्राधिकरण कार्यालयाने दिलेल्या अतिक्रमण नोटिसा मागे घ्याव्यात, आमच्या हक्काची घरे व दुकाने आम्ही पाडू देणार नाही, अशी भूमिका ‘घर बचाओ संघर्ष समिती’चे समन्वयक विजयकुमार पाटील यांनी मांडली. पिंपरी पालिकेच्या चुकीचा सामान्य नागरिकांना त्रास कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित केला. बऱ्याच वेळानंतर पीसीएनटीडीएच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्य प्रवेशद्वारावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत खुलासा करताना सांगितले की, पावसाळा संपेपर्यंत कारवाई करणार नाही. वरिष्ठांशी बोलून निर्णय कळवू. 

‘एचसीएमटीआर’ रस्त्यावरील आरक्षण राज्य सरकारच्या अखत्यारित येते. त्यामुळे यामध्ये बदल होऊ शकतात. प्राधिकरण आणि पालिकेने नागरिकांची मते जाणून घ्यावीत. चर्चेतून तोडगा काढावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: गोराईत रडार, दहिसरमध्ये विकास; राज्य सरकारचा मोठा निर्णय, गृहनिर्माण प्रकल्पांना गती

पाकड्यांना आलीय मस्ती... IPL 2026 ची तारीख जाहीर होताच, Mohsin Naqvi ने खेळला घाणेरडा डाव; भारतीयांच्या डोक्यात तिडीक गेली

मालिकेत मीरा परत आली तरी प्रेक्षक अभिनेत्रीवर नाराज; भलतंच कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला; चाळीसगावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ

IPL 2026 Auction live : लिलावापूर्वी BCCI ची 'गुगली'! परदेशी खेळाडूंसाठी निश्चित केली Salary Cap; जाणून घ्या बदललेला नियम

SCROLL FOR NEXT