Pimpri Pendhar Village Close sakal
पुणे

Pimpalwandi News : बिबट प्रश्नासाठी पिंपरी पेंढार गावाने पुकारला बंद; शरद सोनवणे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा

बिबट्यांची वाढती संख्या व बिबट्यांच्या हल्ल्यात होणारे मृत्यु यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात यावा.

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी - बिबट्यांची वाढती संख्या व बिबट्यांच्या हल्ल्यात होणारे मृत्यु यावर कायमस्वरूपी उपाय करण्यात यावा तसेच जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणे करत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) गावाने स्वयंस्फुर्तीने शुक्रवारी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सकाळी नऊच्या वेळेत गावातील ग्रामस्थांनी गावातुन रॅली काढली व ज्या परिसरात शरद सोनवणे हे आंदोलनासाठी बसले आहेत त्याठिकाणी येऊन गावाने एकमुखी पाठिंबा जाहीर केला.

जुन्नर तालुका बिबट मुक्त झाला पाहिजे हि प्रमुख मागणी करत महाराष्ट्र शासन तसेच वनविभागाचा ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी सरपंच सुरेखा वेठेकर, रामदास वेठेकर, किसन कुटे, रोहिदास वेठेकर, रोहन कुटे, रोहिदास कुटे, उल्हास कुटे, राजेश वामन तसेच मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी देखील येथे उपस्थित होते.

शरद सोनवणे म्हणाले वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्यासोबत चर्चा केली असुन, बिबट प्रश्नावर लवकरच तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी ज्याठिकाणी आता आंदोलनासाठी बसलो आहे, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला ऊस शेती असुन या परिसरात बिबट्यांची संख्या मोठी आहे. जुन्नर तालुका बिबट मुक्त करणे हे माझे उद्दिष्ट असुन, तालुक्यातील जनतेच्या हिताचा विचार करून मी हे आंदोलन करण्यासाठी बसलो आहे.

सरपंच सुरेखा वेठेकर म्हणाल्या की, सुजाता डेरे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाला. याच परिसरात काही महिन्यापूर्वी एका महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेला होता. घरातील सदस्य गेल्याने ते कुटुंब अगदी उध्वस्त होते. जुन्नर तालुका कृषिप्रधान असल्याने शेती केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. दिवसा देखील बिबट्यांचे दर्शन होत असते. वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

शरद सोनवणे यांनी घेतलेली भूमिका हि महत्वाची असुन बिबट प्रश्नासाठी तालुक्यातील प्रत्येकाने त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT