पुणे

रेडझोनमुळे विकास ठप्प

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - तळवडे आयटी पार्कमध्ये बारा मोकळे भूखंड असले, तरी रेडझोनच्या प्रश्‍नामुळे एमआयडीसीला ते उद्योग विस्तारासाठी कोणालाही देता येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. रेडझोनमुळे या ठिकाणचा विकास ठप्प झाला असून, त्या संदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने संरक्षण मंत्रालयाच्या सचिवांशी पत्रव्यवहार केला असला, तरी त्यावर अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) संरक्षण खात्याच्या सचिवांना सहा नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या पत्रामध्ये तळवडे परिसरातील सर्व माहिती दिली आहे. त्यामध्ये स्थानिक लष्कराच्या व्यवस्थापनाकडून एमआयडीसीला ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. या पत्राची प्रत देहूरोड ऑर्डनन्स डेपोचे स्टेशन कमांडर यांनाही देण्यात आली आहे. 

तळवडे आयटी पार्क रेडझोनची बंदी अद्याप उठलेली नाही. एमआयडीसीने २०१२ पासूनच या ठिकाणी नवीन भूखंड देणे बंद केले आहे.

रेडझोनच्या प्रश्‍नामुळे आयटी कंपन्यांची इमारत परवानगी, आराखडा मान्यता ही कामे अडकून पडली आहेत. 

तळवडे आयटी पार्क ७५ हेक्‍टर जागेवर उभे असून, तिथे एमआयडीसीचे ६१ भूखंड आहेत. त्यापैकी ३५ भूखंड उद्योगांना दिले असून, त्या ठिकाणी १७ आयटी कंपन्या कार्यरत आहेत. रेडझोनमुळे बारा भूखंड रिकामे पडले असून, ते कोणत्याही उद्योगांना विकासासाठी देता येत नाहीत. याखेरीज १४ भूखंड व्यावसायिक विभागात देण्यात आले असले, तरी रेडझोनमुळे त्यांचाही विकास अडकून पडला आहे.

तळवडे येथील रेडझोनच्या प्रश्‍नामुळे आयटी पार्कचा विकास थांबला आहे. या संदर्भात एमआयडीसीने जिल्हाधिकारी, लष्कराच्या आस्थापनांशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना आयटी पार्कमधील सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रश्‍नावर लवकर मार्ग निघेल, अशी आशा आहे. 
- संतोषकुमार देशमुख, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: जॅकी श्रॉफचे 'सिंगम अगेन'साठी काश्मीरमध्ये शुटिंग, म्हणाला...

India Head Coach : BCCIसाठी थाला ठरणार मांडवली बादशाह? भारताच्या नव्या कोचच्या निवडीसाठी वापरणार धोनी फॅक्टर

Munjya Teaser: "मुन्नी बदनाम हुई गाणं ऐकायला तो आला अन्..."; 'मुंज्या' चा अंगावर शहारे आणणारा टीझर पाहिलात?

Olive Ridley Turtle : 13 वर्षांत समुद्रात झेपावली तब्बल 55,916 कासवे; दापोली, आंजर्ले, मंडणगडमध्ये घरटी सापडण्याचे प्रमाणही जास्त

Porsche First Car: शंभर वर्षांपूर्वी बनवणार होता इलेक्ट्रिक कार पण बनली भन्नाट स्पीडस्टर, कोण होता पोर्शे?

SCROLL FOR NEXT