पुणे

पुनर्वसनात उतीर्ण; ‘एसआरए’त ‘अनुत्तीर्ण’

सागर सिंगटे

‘एमआयडीसी’मधील सुमारे १०० एकरांवरील १८ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, १२.५ टक्के परतावा यावर सातत्याने पाठपुरावा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विभागीय ‘आयटीआय’ आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहाला शासन मान्यता आणि संभाजीनगर, शाहूनगर येथील ‘जी’ ब्लॉकमधील बंदिस्त बाल्कनी प्रश्‍न निकालात काढून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी स्वतःच्या प्रगती पुस्तकात उत्तीर्ण झाल्याचे शेरे मिळविले आहेत. मात्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याबाबत ते ‘अनुत्तीर्ण’ठरले आहेत. 

संपूर्ण मतदारसंघात जवळपास ३० झोपडपट्ट्या आहेत. अजंठानगर, भाटनगर, बौद्धनगर, मिलिंदनगर, आंबेडकरनगर, कासारवाडी, महात्मा फुलेनगर यासारख्या झोपडपट्ट्यांचा त्यामध्ये अंतर्भाव आहे. मात्र ‘एसआरए’ योजनेअंतर्गत त्यांचे पुनर्वसन रखडले आहेत. त्यामुळे, मतदारसंघाचे बकाल स्वरूप कायम आहे.

जनहिताचा विचार नाही
गेल्या तीन वर्षांत आमदार निधीमधून कोणतेही मोठे काम ॲड.चाबुकस्वार यांनी केले नाही किंवा जनहिताच्या बाजूने निर्णय घेतले नाहीत. निवडणुकीपूर्वी, झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांपर्यंत घरे देण्याची घोषणा केली होती. मात्र, आता वेगळी भूमिका घेत आहे. मागासवर्गीय बेरोजगारांना किती कर्जे मिळवून दिली हे त्यांनी जाहीर करावे.
 - चंद्रकांता सोनकांबळे, तत्कालीन आरपीआय-भाजप युतीच्या उमेदवार

पूर्ण कामे
१३ लाखांचे संगणक
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘विभागीय आयटीआय’ व नोकरदार महिलांच्या वसतिगृहासाठी मंजुरी 
‘जी’ ब्लॉकमधील रहिवाशांचा प्रश्‍न मार्गी लावला.
आकुर्डी, मिलिंदनगर येथील सांस्कृतिक भवन तयार, लांडेवाडी, मोरवाडी भवनांचे काम चालू. 
पिंपरी भाजी मंडईत गाळे.
पोलिस आयुक्तालयासाठी विधानसभेत लक्षवेधी. 

अपूर्ण कामे
पिंपरी कॅम्प येथील बाजारपेठेतील अनधिकृत बांधकामे 
बोपखेलवासीयांसाठी पुलाची उभारणी
संपूर्ण मतदारसंघातील सुमारे ४० टक्के पाणी गळती रोखण्यात अपयश 
झोपडपट्ट्यांमुळे अस्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर, रोगराईसाठी पोषक वातावरण
काही भागांत गुन्हेगारीच्या प्रमाणातही वाढ 
अंतर्गत छोट्या रस्त्यांमुळे वाहतुकीच्या समस्येत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT