पुणे

इम्पोर्टेड बाइक, कारची वाढती क्रेझ

रविंद्र जगधने

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला गती मिळाली. परिणामी शहरातील जमिनींचे भाव गगनाला भिडले. त्याचा फायदा जमीन मालकांना मिळाला. भरघोस पैसा मिळाल्याने अनेकांचे राहणीमान तसेच जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले.

त्यातील इम्पोर्टेड (परदेशांतून मागविलेल्या) कार व बाइक वापरान्यांची संख्या वाढू लागली आहे. सध्या शहरात इम्पोर्टेड ९३९ कार व १३३ बाइक आहेत. 
काही काळी खडकाळ, पडिक जमिनीच्या ओसाड माळरानावर विविध कंपन्या, आयटी पार्क, हॉटेल, विविध प्रकल्प तयार होऊ लागले. त्यामुळे जागा मालकांना जास्त भाव मिळू लागला. ते जमिनी विकू लागले. भरघोस पैशांच्या जोरावर काहींनी उद्योग- व्यवसाय उभारले. काहींनी काही लाख- कोटींच्या घरात असलेली परदेशी वाहने वापरण्यास सुरवात झाली. ते पाहून इतरही हौशी नागरिक परदेशी वाहनांची मागणी करू लागले.

अनेक राजकारणी, बांधकाम व्यावसायिक व उद्योजक इम्पोर्टेड बाइक व कार वापरत आहेत. अत्याधुनिक सुविधा व उच्च तंत्रज्ञान असलेल्या या वाहनांचा मेंटन्सही महागडा असतो. सुरक्षेच्या विविध सुविधा, आरामदायक ठेवण या वाहनांत असते. मात्र, त्यांचा एखादा पार्ट खराब झाला तरी, हजारो-लाखो रुपये खर्च येतो. त्यामच्या दुरुस्ती व सर्व्हिसिंगसाठी तज्ज्ञ अभियंत्यांची नियुक्ती केलेली असते. सदर कंपन्या ग्राहकांना दर्जेदार सेवा देतात. त्याचाच भाग म्हणजे वाहन देशात कोठेही बंद पडले, खराब झाल्यास काही कंपन्या त्या ठिकाणी जाऊन ग्राहकाला सेवा देत असतात. 

अनेक विदेशी कंपन्या कार व बाइकचे उत्पादन भारतात करतात. मात्र, त्यांचे काही मॉडेल विदेशात तयार होत असल्याने ग्राहकांना ते विदेशातून आयात करावे लागतात. परंतु, त्या कंपन्यांनी आयात होणारे मॉडेलच भारतात तयार करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे इम्पोर्टेड गाड्यांची संख्या आगामी काळात कमी होण्याची शक्‍यता आहे. परिणामी ग्राहकांना करात मोठी बचत होईल. 
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड

दृष्टिक्षेपात
२००७ ते ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत शहरात इम्पोर्टेड बाइक १३३, कार ९३९
इम्पोर्टेड वाहनांना सर्वसाधारण वाहनांच्या दुप्पट रोड टॅक्‍स किंवा जास्तीत जास्त २० टक्के 
वर्षभरात : बाइक १३ तर ६७ इम्पोर्टेड कारची नोंद 
इम्पोर्टेड कारसाठी स्वतंत्र पार्किंगची अनेक मोटार कंपन्यांची अट.
सर्वसाधारण दुचाकीला रोड टॅक्‍स सात टक्के, कारला ११ ते १३ टक्के 
कारमधील एयर बॅग सुविधेमुळे अपघातात जीवितास धोका होण्याची शक्‍यता कमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT