पुणे

मेट्रो निगडीपर्यंत होऊ द्या सुसाट

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी - मेट्रो प्रकल्प आणि त्याच्यासमवेत बीआरटी बससेवेमुळे नाशिक फाटा येथील मेट्रो स्थानक प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी प्रवासी मोठ्या संख्येने तिन्ही सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करणार असल्याने तेथे ‘ट्रान्स्पोर्ट हब’ निर्माण होणार आहे. मेट्रो प्रकल्प निगडीपर्यंत वाढविल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रहिवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. मेट्रो पिंपरीच्या पुढे निगडीपर्यंत नेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

नाशिकफाटा येथील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना भोसरीकडून पिंपरीकडे वळण्यात बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे हा चौक सिग्नलविरहित होईल. कासारवाडी रेल्वे स्थानक, त्यालगतच मेट्रो स्थानक, तसेच पुणे-मुंबई रस्ता आणि नाशिक रस्ता यांवरील नियोजित बीआरटी बससेवा यांचा वापर करणारे अनेक प्रवासी या चौकात मोठ्या प्रमाणात एका वाहतूक सेवेकडून दुसऱ्या प्रकारच्या वाहतूक सेवेकडे वळतील. विशेषतः नाशिक रस्त्यावरील बीआरटीला ये-जा करण्यासाठी लोक येथे वाहने बदलतील. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांनी माहिती देण्यासाठी महापालिकेच्या वतीने केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

नाशिक रस्त्याच्या रुंदीकरणाबरोबरच येथे नाशिक फाटा ते मोशीपर्यंत बीआरटी बससेवा येत्या दोन वर्षांत सुरू होईल. पुणे-मुंबई मार्गावरील बीआरटी येत्या दोन महिन्यात सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर एम्पायर इस्टेट पुलावरून काळेवाडी ते ऑटो क्‍लस्टरदरम्यान बीआरटी बससेवा पुढील वर्षी सुरू होईल. या बससेवा मेट्रो रेल्वेसाठी फीडर सेवा म्हणून उपयुक्त ठरणार आहेत.

या सर्व मार्गावरील बससेवांचा उपयोग करून पुण्यात ये-जा करण्यासाठी मेट्रो प्रकल्प पिंपरी महापालिकेपासून पुढे निगडीपर्यंत वाढवावा, अशी मागणी येथील सर्व पक्षांच्या नगरसेवकांनी केली आहे. निगडीत बीआरटी बस स्थानकाची मोठी जागा आहे. त्याच स्थानकावर वरील बाजूला मेट्रो स्थानक होऊ शकते. त्यामुळे निगडीपर्यंत मेट्रो गेल्यास चिंचवड, आकुर्डीच्याही नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा फायदा घेता येईल, असा मुद्दा नगरसेवकांनी मांडला. मात्र, सध्याचे मेट्रोचे दोन मार्ग करण्यात येतील, त्यानंतर त्याच्या विस्ताराबाबत विचार केला जाईल, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी नुकतेच महापालिकेच्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे.

नागपूर मेट्रो सध्या सुरू झाली असून, तेथे पुढील मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले. त्याच पद्धतीने पुण्यातील निगडी तसेच अन्य भागात मेट्रोचा विस्तार पुढील टप्प्यात होईल. नाशिक फाटा येथे तिन्ही वाहतूक सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील. तिन्ही संस्थांना पुरेसे प्रवासी मिळतील.
- डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: प्रचार सभेतील केजरीवालांच्या विधानावर ईडीचा आक्षेप! सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं? वाचा

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Fact Check: प्रभू श्रीरामांची प्रतिकृती हातात घेतलेला ओवेसींचा 'तो' फोटो एडिटेड

Latest Marathi News Live Update : श्रीकांत शिंदेंच्या संकल्पपत्राचे अनावरण

ED Action : ''जप्त रक्कम मंत्री आलम यांचीच'', ‘ईडी’चा न्यायालयात दावा; प्रत्येक कंत्राटामध्ये १.५ टक्के वाटा

SCROLL FOR NEXT