Pisoli Undri Mahammadwadi was Stream cleaned by municipal administration pune  sakal
पुणे

पिसोळी, उंड्री-महंमदवाडी ओढ्याची पालिका प्रशासनाने केली स्वच्छता

कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने पिसोळी, उंड्री, महंमदवाडीकडे जाणाऱ्या ३३ फूट रुंद आणि दीड किमी लांबीच्या ओढ्याची स्वच्छता केली

सकाळ वृत्तसेवा

उंड्री : कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने पिसोळी, उंड्री, महंमदवाडीकडे जाणाऱ्या ३३ फूट रुंद आणि दीड किमी लांबीच्या ओढ्याची स्वच्छता केली. मागिल वर्षी पुराच्या पाण्यात कामगार वाहून जात असताना नागरिकांनी तातडीने धाव घेत त्याचे प्राण वाचविले होते. भिंताडेनगर, हिल्स अँड डिल्स सोसायटी, संस्कृती स्कूलशेजारून हा ओढा महंमदवाडीकडे जातो. मागिल वर्षी पावसाच्या पाण्याचा पूर आल्याने सोसायट्यांमध्ये आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले होते.

पूराच्या पाण्यात कार आणि एक व्यक्ती वाहून गेली होती. मात्र, सतर्क नागरिकांमुळे त्याचा प्राण वाचला आणि कारही नागरिकांनी पुरातून बाहेर काढली होती. यावर्षी अशी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी राजेंद्र भिंताडे, सुभाष घुले यांनी ग्रामस्थांच्या वतीने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ओढ्याची स्वच्छता केला. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे म्हणाल्या की, पावसाळापूर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यामध्ये कोठेही पूरस्थिती होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ओढा स्वच्छतेची कामे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026, MI vs UPW: मुंबई इंडियन्सचा तिसरा पराभव! एमेलिया केर-अमनज्योत कौर लढल्या, पण लेनिंगची युपी वॉरियर्सच पडली भारी

आता त्याचे रस्ते बदललेत... दिलीप कुमार यांच्यावर का भडकलेले बाळासाहेब ठाकरे? सांगितलेलं ऐकलं नाही तर...

Junnar Leopard : माणिकडोह केंद्रात बिबट्यांचा हाऊसफुल्ल मुक्काम! ५० बिबटे लवकरच गुजरातच्या 'वनतारा'मध्ये होणार स्थलांतरित

Uddhav Thackeray म्हणाले Mumbai चा महापौर आपलाच, शिंदेंनी नगरसेवक हॉटेलात हलवले | BMC Update | Sakal News

Vasai Virar Mayor : वसई-विरारमध्ये बविआची सत्ता, पण महापौर कोण? आरक्षणाच्या सोडतीकडे साऱ्यांचे डोळे!

SCROLL FOR NEXT