Pistol smuggling case, Pune, Crime News,  swargate Police, Pune
Pistol smuggling case, Pune, Crime News, swargate Police, Pune  
पुणे

पुण्यात 'लादेन' गँगचा पर्दाफाश; गावठी पिस्तुल तस्करीच्या आरोपाखाली चौघांना अट

सकाळ ऑनलाईन टीम

पुणे :  बेकायदा पिस्तुल बाळगुन त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराकडुन स्वारगेट पोलिसांनी तब्बल 11 गावठी बनावटीचे पिस्तुल व 31 जिवंत काडतुसे असा साडे चार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. पोलिसानी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. बारक्या उर्फ प्रमोद पारसे, राजू जाधव (वय 20, रा. माणगाव, हवेली), बल्लूसिंग शिकलीगर ( रा. निमखेडी, बुलडाणा), लादेन उर्फ सोहेल मोदीन आसंगी (रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्या संशयीत आरोपीची नावे आहेत. 


वानवडी येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास केला जात असताना प्रमोद पारसे हा तरुण स्वारगेट पीएमपीएल बसस्थानकाजवळ त्याच्या मित्राची वाट पाहात असल्याची व त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तुल असल्याची खबर स्वारगेट पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्रमोदला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली जात असताना अन्य आरोपींची नावे पुढे आली. त्यानुसार पोलिसांनी अन्य आरोपींना तत्काळ अटक केली आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT