narayanwadi.jpg 
पुणे

या रस्त्यावरून शेतमालाची वाहतूक करायची तरी कशी? ; नारायणवाडीकरांचा सवाल

रवींद्र पाटे

नारायणगाव (पुणे) : अरुंद रस्ता, रस्त्यावर पडलेले एक ते दीड फूट खोलीचे खड्डे, रस्त्याच्या एका बाजूला खोल चारी तर दुसऱ्या बाजूला उतार आशा अवस्थेत शेतमालाची वाहतूक कशी करायची, असा प्रश्न येथील मीना शाखा कालव्याच्या पोटचारीवर असलेल्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नारायणवाडी भागातील शेतकऱ्यांना पडला आहे. 

नारायणगाव येथून पूर्व पश्‍चिम मीना शाखा कालवा गेला आहे. या कालव्याच्या दक्षिण बाजूस खडकवाडी ते हिवरे तर्फे नारायणगाव दरम्यान सुमारे चार किलोमीटर लांब पोटचारी काढण्यात आली आहे. मीना शाखा कालव्यातील पाणी पोटचारीत सोडून सिंचन केले जाते. तसेच या चारीद्वारे मीना नदीतील कोल्हापूर बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. यामुळे हा भाग बारमाही बागायती झाला आहे. तीस वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या या चारीलगत पाटबंधारे विभागाने सुमारे बारा फूट रुंद रस्ता केला आहे.

पोटचारीसाठी व रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत. या रस्त्याचा वापर शेतकरी रहदारी व शेतमालाच्या वाहतुकीसाठी करत आहे. मागील अनेक वर्षे दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पर्यायी रस्ता नसल्याने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी शेतकऱ्यांनी कुकडी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कालवा, चारी व रस्त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. मात्र, मागील अनेक वर्षे हा रस्ता शेतकरी वर्गणी काढून दुरुस्त करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यामुळे रस्ता दुरुस्त कसा करायचा असा प्रश्न आहे. लोकप्रतिनिधी अथवा स्थानिक ग्रामपंचायतीने हा रस्ता दुरुस्त करून शेतकऱ्यांची अडचण दूर करणे आवश्‍यक आहे. 
- श्रीपत मेहेत्रे, अमोल पाटे, शेतकरी 
 

रस्ता दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे आर्थिक तरतूद व यांत्रिक साहित्य नाही.हा रस्ता जिल्हा परिषद फंडातून दुरुस्त करता येईल. 
- प्रशांत कडूसकर, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT