Kokan Diva Fort
Kokan Diva Fort Sakal
पुणे

Kokan Diva Fort : पुणे परिसर दर्शन : कोकणचा सर्च लाइट ‘कोकण दिवा’

सकाळ वृत्तसेवा

पुण्याला चहूबाजूंनी निसर्ग आणि इतिहास भरभरून दिलेला आहे. अशाच एक कोपऱ्यात दडलेला, त्याचा फारसा इतिहास माहीत नसलेला, परंतु निसर्गाने नटलेला किल्ला म्हणजे कोकण दिवा.

पुण्याला चहूबाजूंनी निसर्ग आणि इतिहास भरभरून दिलेला आहे. अशाच एक कोपऱ्यात दडलेला, त्याचा फारसा इतिहास माहीत नसलेला, परंतु निसर्गाने नटलेला किल्ला म्हणजे कोकण दिवा. पानशेत धरणाच्या शेवटी दापसरे व त्यापुढे घोळ नावाचे गाव आहे. इथूनच चालत दक्षिणेस निघाले की रमतगमत गारजाई वाडीला पोहोचतो. ही वाडी डोंगरदऱ्यांनी वेढलेली आणि जंगलात दडलेली आहे. इथून पुढे जंगलवाटेने पायपीट करून साधारण दीड-दोन तासात गडावर जाता येते. वाटेत आपल्याला छोटेसे एक पाषाणी मंदिर लागते. एकाच शिळेमध्ये हे मंदिर खोदलेले असून, दाट देवराईमध्ये लपलेले आहे. देवराई म्हणजे देवाचे जंगल. हे जंगल गाववाले कधीही तोडत नाहीत, ते पवित्र मानतात.

हा गड म्हणजे एक छोटी चौकी आहे. रायगडाभोवती अशा छोट्या किल्ल्यांची एक मालिका आहे. या किल्ल्यावर एक गुहा, दोन पाण्याची टाकी आणि छोटासा खडकाळ माथा आहे. माथ्यावरून रायगड आणि खोल तळ कोकण दिसते. या किल्ल्याचे ‘कोकण दिवा’ हे नाव किती सार्थ आहे हे कळते. कोकणातून सांदोशी या गावातून एक वाट वर येते, त्याला कावल्याची वाट असे म्हणतात. जवळच एक खिंड असून त्याला कावल्या बावल्याची खिंड म्हणतात.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने जुल्फीकार खानला रायगडाला वेढा घालण्यास सांगितले. तो वेढा अधिक मजबूत करण्यासाठी शहाबुद्दीन खानला मदतीला पाठवले. हा खान कावल्या बावल्या खिंडीतून सैनिक घेऊन जाणार होता, पण कोकण दिवा ज्यांच्या ताब्यात होता, ते जिवाजी सर्कले नाईक त्यांच्यासोबत गोदाजी जगताप व नऊ मावळ्यांनी आकस्मिक हल्ला करून खिंडीतून सैन्याला माघारी पिटाळले. अशा घटनेचा साक्षीदार आणि दाट जंगलांनी वेढलेला हा कोकण दिवा खरंच चमकदार आहे.

काय पहाल

दाट जंगलांनी वेढलेली वाट, एक पाषाणी मंदिर, त्याची देवराई, गडावरची छोटीशी गुहा, दोन पाण्याची टाकी, गडाच्या माथ्यावरती असलेले छोटे खळगे ज्याचा तात्पुरता उपयोग करून तंबू उभारून तिथे चौकी उभारता येई, वरून दिसणारे रायगड, लिंगाणा हे किल्ले तसेच पूर्ण कोकण आणि आजूबाजूचा डोंगर परिसर.

कसे पोहचाल

स्वारगेटहून पानशेतच्या पुढे घोळ या गावाला जाण्यासाठी मुक्कामी एसटी आहे किंवा रायगड जिल्ह्यात रायगडपासून जवळच सांदोशी गाव आहे तिकडूनही किल्ल्यावर जाता येते. याशिवाय स्वतःच्या वाहनानेही घोळ गावात जाता येईल.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी- गिर्यारोहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

Weight Gain Foods : ‘या’ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने झपाट्याने वाढू शकते वजन, खाण्यापूर्वी जरूर करा विचार

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Marathi News Live Update: पुण्यात चारचाकीच्या धडकेत तरुण-तरुणीचा मृत्यू

Chandu Champion Trailer: मुरलीकांत पेटकर यांची गोष्ट; प्रत्येक फ्रेममध्ये दिसते कार्तिक आर्यनची मेहनत, कसा आहे 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर?

SCROLL FOR NEXT