education1.jpg 
पुणे

शैक्षणिक सत्राचा आरखडा तयार; असे असेल नियोजन...

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत शैक्षणिक सत्राबाबत राज्य शासनाने सूचना मागितल्या नुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे  नियोजन प्रारूप आराखडा सदर करण्यात आला असल्याची माहिती परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष गुलाबराव गवळे व उपाध्यक्ष मोहन ओमासे यांनी सांगितली. 

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...
सदर प्रारूप तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदतर्फे अभ्यास गट तयार करून, त्याप्रमाणे  राज्यातील परिषदचेे पदाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या कडून माहिती संकलित केली. त्यातील शासनाला सादर केलेले महत्वाचे प्रारूप मुद्दे पुढील प्रमाणे :-

  1.  कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरु करण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावरच टप्प्या- टप्प्याने सत्र सुरु करावे. यामध्ये  इयत्तांचे  १ ते ५,  ६ ते ८ ,  ९ ते १२ व महाविद्यालयीन असे टप्पे असावेत.
  2. पूर्व प्राथमिक शाळा शक्यतो सुरु करू नयेत.
  3. नवीन प्रवेश RTE नुसार व केंद्रीय पद्धतीने करावेत.
  4. भौतिक सुविधा, सॅनिटायझर व मास्क इत्यादी शाळांना पुरवण्यात यावेत.
  5. शाळा, महाविद्यालयाच्या कार्यालयिन कामाची वेळ सकाळी ९ ते दुपारी ४ असावी. एका वर्गात २० ते २५ विद्यर्थी असावेत. याकरिता विद्यार्थ्यांना एक दिवसाआड शाळेत बोलवावे. गरजेनुसार शिक्षक पदे मंजूर करावीत.
  6. प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात एक शारीरिक शिक्षण शिक्षक असावेत.
  7.  नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन असू नये. परंतु आवश्यक इयत्ता निहाय क्षमता विकसित करण्याचे काम शिक्षकांनी करावे. 
  8. अध्यापनासाठी अत्यावशक कामाचे दिवस उपलब्ध करून देण्यासाठी सुट्ट्यांचा कालावधी कमी करावा. 
  9. अध्यापनातून  विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्षमता निर्माण करण्यसाठी स्वाध्याय प्रक्रियेचा वापर करावा.
  10. ऑनलाईन अध्यापन हा पर्याय नसून तो पूरक आहे. त्याप्रमाणे त्याचा वापर व्हावा.
  11. मध्यान्ह भोजन व्यवस्था शैक्षणिक सत्रापुरती स्थगित ठेवावी. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भौतिक दुरतेचे पालन करून तांदूळ वाटप करावा. 
  12. एकाच परीसरातील शाळांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा भरणे व सुटण्याची वेळ यामध्ये अंतर असावे. 
  13. सत्राच्या सुरुवातीला सर्वांची (शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी ) कोरोना रॅपीड टेस्ट घ्यावी. 
  14. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांचा विमा काढण्यात यावा.
  15. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करू नये. 
  16.  इयता १२ वीचा पाठयक्रम  चालू वर्षाकरीता जुनाच ठेवावा .
  17. नवीन शिक्षक भरती बंदीतून आरोग्य विभागाप्रमाणे शिक्षण विभागाला वगळावे .
  18. शिक्षणातील खालील प्रलंबित ज्वलंत समस्या तात्काळ निकाली काढाव्यात :- 
  • अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २० % वेतन अनुदान तसेच अंशता अनुदानित प्राथमिक , माध्यमिक  शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना २० % वेतन देण्यासंदर्भात शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावा.
  • अघोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या वर्ग तुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून अनुदान देण्या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करावा. 
  • उच्च माध्यमिक शाळातील सन २००३ ते २०१९ या कालावधीत प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरीत करावे.  
  •  टी. ई. टी. ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून करावे .
  • अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक  स्तर )  अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारक यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करावे व  समयोजित करावे .
  • रात्रशाळेला पूर्ण वेळ शाळेचा दर्जा द्यावा.

विद्यार्थी हे राष्ट्राची संपत्ती आहेत त्यानुसार त्यांच्या जीविताचे रक्षण करणे गरजेचे आहे. १५ व २६ जूनपासून कोणत्याही परिस्थितीत शाळा, महाविद्यालय सुरु करू नयेत. कोरोना संकट पूर्णपणे संपुष्टात आल्याची खात्री झाल्यावर शाळा व महाविद्यालय सुरु करावेत असेही नमूद करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शैक्षणिक सत्र सुरु करण्यापूर्वी आवश्यक सूचनाचे प्रारूप शासनाकडे सदर केले आहे.  अभ्यास गटातील तज्ञ पुढील प्रमाणे :-  पूजा चौधरी -अभ्यास गट प्रमुख, सदस्य :-  वेणुनाथ कडू , नरेंद्र वाटकर , किरण भावठणकर , सुनील पंडित, बाबासाहेब काळे. मा. आमदार भगवानराव साळुंखे व  आमदार नागो गाणार , राजेश सुर्वे, सुधाकर मस्के , निरंजन गिरी, विलास सोनार, संजय यवतकर , जितेंद्र पवार , राजकुमार बोनकिलेे .  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर प्रारूप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिल्याची माहिती शिक्षक परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष  राजेंद्र नागरगोजे, मा.  आमदर भगवानराव साळुंखे, बाबासाहेब काळे , कार्याध्यक्ष जितेंद्र पवार, सोमनाथ राठोड, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT