Plantation of 5 thousand 555 saplings at Landewadi Sakal
पुणे

आंबेगाव तालुक्यात लांडेवाडी येथे पाच हजार ५५५ रोपांचे महावृक्षारोपण

प्रत्येक गावात वृक्षलागवड व संवर्धनाची चळवळ रुजली पाहिजे : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

डी. के. वळसे पाटील

मंचर - “दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान चिंताजनक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पक्षी, प्राणी, मानव यांच्या संरक्षणासाठी व पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रत्येक गावात वृक्षलागवड व संवर्धनाची चळवळ रुजली पाहिजे. त्यासाठी जनजागृती अत्यंत महत्वाची आहे. या प्रश्नाकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.”असे आवाहन शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.

लांडेवाडी- चिंचोडी (ता.आंबेगाव) येथे जुन्नर वन व मंचर वन परिक्षेत्र विभागाच्या वतीने आठ हेक्टर जागेत पाच हजार ५५५ रोपांचे महावृक्षारोपण आढळराव पाटील व जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आढळराव पाटील बोलत होते. न्यु इंग्लिश स्कूल व शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोपांची लागवड केली.

यावेळी “झाडे लावा, झाडे जगवा” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या प्रसंगी जुन्नर वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, घोडेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, खेडचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौधळ, सरपंच अंकुश लांडे पाटील, उपसरपंच सुभाष लांडे, रामदास आढळराव पाटील, श्याम गुंजाळ, श्यामल चौधरी,मुख्याध्यापक सुरेश डोके उपस्थित होते.

सातपुते म्हणाले “वृक्ष सवर्धनाची जबाबदारी येथील विद्यार्थ्यांनी स्वीकारली आहे. दरवर्षी वृक्षासमावेत सदर विद्यार्थी सेल्फी काढतील.तीन वर्ष वृक्षाचे उत्कृष्ठ संगोपन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाईल. आढळराव पाटील यांनी वृक्ष संगोपनासाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याचे सहकार्य निश्चित कौतुकास्पद आहे.”

“ डोंगर उतारावर चिंच, जांभूळ, आंबा,कवठ,साग, कडुलिंब, आवळा, हिरडा आदी आर्थिक उत्पन्न देणारे वृक्ष लावले आहेत. वन खात्याप्रमाणेच विद्यार्थी व ग्रामस्थांनी वृक्षांचे संवर्धन व संरक्षण करावे.”

- स्मिता राजहंस, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT