Plasma Google
पुणे

प्लाझ्मा द्या, दोन हजार मिळवा

कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याने प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोना संसर्गाच्या रुग्णांना प्लाझ्मा थेरपी फायदेशीर ठरत असल्याने प्लाझ्माची मागणी वाढली आहे. त्यामुळे प्लाझ्मा दात्यांची संख्या वाढविण्यासाठी महापालिकेकडून दोन हजार रुपये प्रोत्साहनात्मक मदत दिली जाणार आहे, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी दिली. सध्या खासगी रुग्णालयांमधील रुग्णांसाठी प्रत्येकी सहा हजार रुपये दराने प्लाझ्मा घ्यावा लागत आहे. त्याऐवजी आता महापालिकेच्या रक्तपेढीतून अशा रुग्णांनाही मोफत प्लाझ्मा पुरविण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. सार्वजनिक व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यासाठी प्लाझ्माची मागणीही वाढली आहे. गंभीर रुग्णांवर उपचारांसाठी प्लाझ्मा थेरपीकडे एक आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे प्लाझ्मादात्यांची संख्या वाढविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले असून, दात्यांना प्रोत्साहनात्मक मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी सांगितले. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, ‘कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करू शकतात. मात्र, पुन्हा संसर्ग होईल या भीतीने प्लाझ्मा दात्यांची संख्या कमी झाली आहे. प्लाझ्मा किंवा प्लाझ्मा थेरपीसाठी दाता हवा आहे, असे असंख्य फोन आणि मेसेज येत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात रक्तदान मोहीम थंडावते. शिवाय कोरोना संसर्गामुळे रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा फटका प्लाझ्मादानाला बसला आहे. शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या वतीने आवाहन करूनही प्लाझ्मा देण्यासाठी फारसे लोक पुढे येत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. तो भरून काढण्यासाठी कोरोनामुक्त व्यक्ती व शहरातील विविध सामाजिक संघटनांनी कोरोनावर मात करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT