Plasma forearms machine at Sassoon Hospital.jpg 
पुणे

पुण्यात कोरोनाबाधितांवर होणार प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग? प्लाझ्मा फोरेसेस मशीन ससून रुग्णालयात 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांवर प्रायोगिक तत्वावर प्लाझ्मा उपचाराबाबत प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ससून रुग्णालयाला उद्योजक अविनाश भोसले यांनी प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


- प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठीचा प्रस्ताव आयसीएमआरकडे सादर
प्लाझ्मा फोरेसेस मशिन वापरण्यासाठी परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव आयसीएमआरकडे पाठविण्यात आला आहे. याबाबत परवानगी मिळाल्यानंतर उपचार सुरु करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. या मशिनद्वारे प्लाझ्मा वेगळा काढला जावू शकतो आणि हा प्लाझ्मा कोविड रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जावू शकतो.

Video : आठ बाय आठ फुटांच्या खोलीत, कसं पाळायचं डिस्टंसिंग?

कोण बनु शकतो प्लाझ्मा डोनर?
- असा प्लाझ्मा 18 वर्षांवरील पुरुष किंवा महिला व्यक्ती देवू शकते. तथापि संबंधित महिला अद्यापर्यंत गर्भवती राहिलेली नसावी.  तसेच त्या व्यक्तीचे वजन 55 किलो पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- प्लाझ्मा देणाऱ्या व्यक्तीच्या कोविड-19 च्या शेवटच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह असणे आवश्यक आहे. यानंतर 14 दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोनाच्या रुग्णाला प्लाझ्मा देवू शकतात.
- प्लाझ्मा डोनेट करण्यापूर्वी मागील 28 दिवसात या व्यक्तीमध्ये कोविड-19 ची कोणतीही लक्षणे आढळलेली नसावीत.
- संबंधित व्यक्ती हिपॅटाइटिस- बी तसेच एचआयव्हीबाधित नसणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रक्तदान करताना तपासणी करण्यात येणारा रक्तगट यासह आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात येईल

Coronavirus : पुण्यातून कोरोनाचा होऊ शकतो नायनाट; पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT