s p College.jpg 
पुणे

अकरावी प्रवेशाबाबत शिप्र. मंडळाचा मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिक्षण प्रसारक मंडळीच्या स. प. महाविद्यालय आणि नूमवि (मुलांची व मुलींची) या संस्थांमध्ये अकरावीमध्ये पाच टक्के व्यवस्थापन कोट्यातून खेळाडूंना केवळ प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण प्रसारक मंडळीच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे. शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष  अॅड. एस्. के. जैन, सदस्य सतीश पवार व सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांनी आज ही माहिती दिली. ही प्रवेश प्रक्रिया दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू केली जाणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत संस्थेला पाच टक्के जागा संस्थास्तरावर भरण्याची मुभा असते. त्या अंतर्गत या संस्थेने व्यवस्थापन कोट्याची प्रक्रिया राबविण्यासाठी खास क्रीडा व्यवस्थापन कोटा प्रवेश समिती नेमण्यात येणार आहे. या समितीमध्ये प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील क्रीडा संचालक, व्यवस्थापन समितीचे तीन प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात येणार आहे.
व्यवस्थापन कोट्यातून खेळाडू विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी विशेष धोरण ठरविण्यात आले आहे.

शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त सतीश पवार, अशोक वझे, रणजीत नातू, प्राचार्य डॉ. दिलीप शेठ आणि रणजीत चामले यांनी विविध मुद्यांवर अभ्यास करून व्यवस्थापकीय कोट्यातून खेळाडूंसाठी प्रवेश धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार खेळाडू विद्यार्थ्यांना 5 टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात येणार आहे.

या धोरणानुसार क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, अॅथलेटिक, जिमनॅस्टिक्स, कबड्डी, खो खो, कुस्ती, मल्लखांब बॅडमिंटन, टेनिस, टेबल टेनिस, नेमबाजी, धनुर्विद्या, जलक्रीडा, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, साहसी क्रीडा खेळ या विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळविणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, महाराष्ट्र राज्य व जिल्हा पातळीवर विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या व विविध पदके मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश देताना विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर या प्रवेशाआधी केंद्रीय प्रवेशसाठी अर्ज भरून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया संपल्यावर पाच टक्के व्यवस्थापन कोट्याची प्रवेश प्रक्रिया खेळाडू विद्यार्थ्यांसाठी पूर्ण केली जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

खेळाडूंना खेळांसाठी प्रोत्साहन देणे, चांगले गुणवंत खेळाडू निर्माण करणे याकरिता त्यांच्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय व जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत उत्कृष्ट व चमकदार कामगिरी करून देशाचे, महाराष्ट्राचे आणि जिल्ह्याचे नाव चमकवावे, त्याचबरोबर महाविद्यालयाचेही नाव झळकेल आणि क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयाचा  एक वेगळा इतिहास निर्माण होईल अशी अपेक्षा या धोरणामागे आहे, असे एस. के. जैन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT