महाराष्ट्रात ढोलताशात तसंच महत्त्व आहे जसं पंजाबमध्ये भांगडाला, गुजरातेत गरब्याला आहे. त्यामुळे ढोलताशा या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. त्यांनी या विषयीचं पत्र युवक आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना दिलं आहे. (Playing Dhol Tasha should consider as National Game)
या पत्रात गिरीश बापट (MP Girish Bapat) लिहितात, "पंजाबमध्ये भांगडा, गुजरातेत गरब्याला जितकं महत्त्व आहे, तसंच महत्त्व महाराष्ट्रात ढोल ताशा वाजवण्याला आहे. ढोल ताशाच्या खेळाला महाराष्ट्र अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राचीन काळातही ढोलताशाला अनेक ठिकाणी पूजनीय मानलं गेलं आहे. फक्त महाराष्ट्रापुरतीच ढोलताशाची ओळख नसून आता गुजरात, गोवा, सिल्व्हासा, आंध्रप्रदेशापर्यंत या खेळाचा विस्तार झाला आहे."
पत्रात पुढे म्हटलं आहे की, अनेक पारंपरिक सणांच्या दिवशी ढोलताशा वाजवला जातो. कुस्तीच्या खेळांदरम्यान कुस्तीगीरांचं मनोबल वाढवण्यासाठी हलगी वाजवली जाते. महाराष्ट्र आणि देशाच्या इतर भागांमध्ये ढोलताशाचा असलेलं महत्त्व लक्षात घेता मी विनंती करतो की ढोलताशा वादनाच्या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा द्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.