पुणे

पुणे : मोदींचे वर्गमित्र हरीभाई शहा यांचा आठव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गुजराती समाजातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरीभाई शहा (वय 63) यांचा इमारतीच्या आठव्या मजल्यावरील एका सदनिकेच्या बाल्कनीतून खाली पडून गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ही घटना सेनापती बापट रस्ता परिसरातील एका सोसायटीमध्ये घडली. दरम्यान, शहा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्गमित्र असल्याने मोदी यांचा त्यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. 

शहा हे सॅलिसबरी पार्क येथील आनंद नगर परिसरामध्ये राहतात. शनिवारी दुपारी ते सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकारनगर जवळ असलेल्या रोहन तपोवन या इमारतीमध्ये राहणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडे जेवण करण्यासाठी गेले होते. दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या नातेवाईकांसह सदनिकेच्या बाल्कनीमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांचा तोल गेल्याने ते इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन खाली पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्‍यासह संपुर्ण शरीराला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारांपुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. 

रामदेव बाबा ट्रस्ट, दारुवाला पुलाजवळील आरसीएम गुजराथी हायस्कुलचे ते विश्‍वस्त होते. पुणे गुजराथी केळवणी संस्थेचे पदाधिकारी म्हणूनही शहा यांनी काम पाहिले. जनसेवा फाऊंडेशनचे मार्गदर्शक व विविध सामाजिक संस्थांद्वारे ते सामाजिक कार्यात सक्रीय होते. 

शहा यांना उंचावरुन बघण्याचा त्रास होत असे. त्यातच ते आठव्या मजल्यावर गेले होते. त्यानंतर तेथील बाल्कनीमध्ये थांबले होते. त्याचवेळी त्यांचा तोल जाऊन ते खाली पडल्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यु झाला, असे चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी स्पष्ट केले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT