PM Modi Pune Visit PM Modi donate lokmanya tilak national award 2023 prize money to namami gange project  
पुणे

PM Modi Pune Visit : मोदींकडून पुरस्काराची रोख रक्कम 'नमामि गंगे'ला अर्पण

रोहित कणसे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे येथे आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील एसपी कॉलेज प्रांगणात आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात आला. दरम्यान पंतप्रधानांच्या सुचनेनुसार या पुरस्कारात स्वरूपात मिळलेली रक्कम नमामि गंगेला देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदींनी देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा स्वरूपात एक सन्मानपत्र एक विशेष ट्रॉफी ज्यामध्ये केसरीचा पहिला अंक, लोकमान्यांची पगडी आणि लोकमान्यांची एक प्रतिमा याचा समावेश आहे देण्यात आली. यासोबतच पुरस्कार स्वरूपात एक लाख रुपयांची रक्कम देखील देण्यात आली. मात्र पुरस्कारात मिळालेली ही रक्कम पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार नमामि गेंगे प्रोजेक्टला देण्यात आली आहे.

PM मोदींकडून भाषणाची मराठीत सुरूवात

लोकमान्य टिळक यांची आज १०३ वी पुण्यतिथी आहे. देशाला अनेक महानायक देणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमिला मी कोटी कोटी वंदन करतो अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भाषणाला सुरूवात केली.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा असून मी जितका उत्साहीत आहे तेवढाच भावूक देखील आहे. आज आपले आदर्श बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे. या दोघांना मी श्रद्धापूर्वक नमन करतो असे पंतप्रधान म्हणाले. आज मला पुण्याच्या पावन भूमिवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर येण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान या कार्यक्रमाला शरद पवार, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिपक टिळक, सुशिलकुमार शिंदे आणि टिळक परिवारातील सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Shubh Muhurat 2025 : दसरा पूजनाची सर्वोत्तम वेळ कधी, अन् रावण दहनानंतर कोणतं काम करावं?

Vani News : आदिमाया सप्तशृंगी मातेच्या कीर्तीध्वजाची भव्य मिरवणूक.. गडाच्या शिखरावर मध्यरात्री कीर्तीध्वज डौलात फडकणार....

वेळापत्रक आरक्षणाचे! झेडपीच्या गटाची अन्‌ पंचायत समित्यांच्या गणांची १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत; जिल्हाधिकारी पाठविणार एससी, एसटी प्रवर्गातील जागांचा प्रस्ताव

IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज

Ravindra Dhangekar News : नीलेश घायवळ प्रकरणावर चंद्रकांतदादा गप्प का? ; रवींद्र धंगेकरांचा सवाल!

SCROLL FOR NEXT