Pune Metro Sakal
पुणे

Pune Metro : पुणेकरांसाठी खुशखबर! मेट्रोची 'ही' स्थानके आजपासून होणार खुले; वाचा मार्ग आणि वेळ

रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा सुरू असून प्रत्येकी १० ते १५ मिनीटांनी मेट्रोच्या फेऱ्या होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुणे मेट्रो स्थानकाच्या विस्तारित कामांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पुणेकरांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांच्या सेवेत नवीन मेट्रो स्थानकांचा सामावेश होणार आहे. वनाज कॉर्नर ते गरवारे महाविद्यालयापर्यंत असलेली मेट्रो लाईन आता वाढली आहे.

शिवाजीनगरमधून थेट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेपर्यंत नागरिकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे. मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून हे स्थानके प्रवाशांसाठी खुले होणार आहेत.

दरम्यान, मेट्रोच्या एक्वा आणि पर्पल लाईनवरील विस्तारीत एकूण ११ स्थानकांचा मेट्रो सेवेत सामावेश होत आहे. त्यामध्ये ९ उन्नत आणि २ भूमिगत स्थानकांचा सामावेश आहे. वनाज कॉर्नर ते रूबी हॉल क्लिनीक ही एक्वा लाईन आहे, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते सिव्हिल कोर्ट ही पर्पल लाईन आहे.

एक्वा लाईनने आधी वनाज पासून गरवारे महाविद्यालयापर्यंत प्रवास करता येत होता. पण आता वनाज पासून रूबी हॉल क्लिनिक पर्यंत प्रवास करता येणार आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका भवनापासून फुगेवाडीपर्यंत करता येणारा प्रवास आता सिव्हिल कोर्टापर्यंत करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही महापालिका मेट्रोद्वारे जोडल्या जाणार आहेत.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही सेवा सुरू असून प्रत्येकी १० ते १५ मिनीटांनी मेट्रोच्या फेऱ्या होणार असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.

शिवाजीनगर येथे भूमिगत मेट्रो स्थानके

पुण्यातील मध्यभागी आणि प्रवाशांची गर्दी असलेल्या शिवाजीनगर येथे मेट्रोचे भूमिगत स्थानक होणार असून हे स्थानक प्रवाशांना आकर्षित करणारे ठरणार आहे. शनिवार वाडा, लाल महाल आणि गड किल्ल्यांच्या बुरूजांची प्रतिकृती या स्थानकामध्ये पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT