PM Narendra Modi Pune Visit 1 august starts with dagdusheth halwai ganapati temple  
पुणे

PM Modi Pune Visit : मोदींच्या पुणे दौऱ्याची सुरूवात गणपती दर्शनाने! दगडूशेठ मंदिरात जय्यत तयारी

रोहित कणसे

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना आज लोकमान्य टीळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. दरम्यान मंदिर प्रशासनाकडून पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमिवर सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने दगडूशेठ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असणार आहे. तसेच लाईव्ह प्रक्षेपण देखील बंद असणार आहे असे सांगण्यात आले आहे. दरम्यान दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून पुणेकरांना सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले.

दगडूशेठ गणपती मंदिरात पंतप्रधान मोदी येत असल्याने त्यांच्या स्वागतासोबतच सुरक्षेसाठी देखील बंदोबस्त ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच शहरातील अनेक महत्वांच्या रस्त्यांवरील वाहतूकीमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. मोदींचं मंदिरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात येईल. तसेच ढोल-ताशाच्या वादनानंतर पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरात महापूजा आणि महाआरती करण्यात येईल.

असा असेल मोदींचा पुणे दौरा

सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांचं पुणे शहरात विशेष विमानाने आगमन होईल. तेथून हेलिकॉप्टरने कृषी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर येतील त्यानंतर सुमारे १०.४५ वाजता - श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, ११.३५ वाजता - एस. पी. महाविद्यालयात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमास ते उपस्थित असतील.तर दुपारी १२.३० वाजता शिवाजीनगर पोलिस मुख्यालय मैदानावर मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे उद॒घाटन त्यांच्या हस्ते होईल नंतर पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती लावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: घोडबंदर मार्ग 6 तास पाण्याखाली, चालकांचा वाहतूक कोंडीसोबत सामना; ठाणेकरांचे हाल

Latest Marathi News Live Updates: अमळनेरात पुराचा कहर; एकाचा मृत्यू, २४ तासांनंतरही शोध निष्फळ

प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांचा दोषमुक्त करण्याचा न्यायालयाकडे अर्ज, अर्जात नेमके काय? वाचा...

Mumbai News: मुंबईत घर घेणं महागलं! नागरिकांच्या खिशाला फटका, 'इतक्या' टक्क्यांनी किमतीत वाढ, अहवाल समोर

सोहम बांदेकर अडकणार लग्नबंधनात! 'ही' मराठी अभिनेत्री होणार आदेश अन् सुचित्रा बांदेकरांची सून?

SCROLL FOR NEXT