Rubal Agarwal File photo
पुणे

पुण्यात तिसरी लाट? महापालिकेचे जोरदार नियोजन

शहरात महापालिकेच्या रुग्णालयात जम्बोसह दीड हजार बेडची व्यवस्था आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग पाहता ही संख्या कमी असल्याने रुग्णालयांचीच संख्या वाढविण्यात येईल.

सकाळ वृत्तसेवा

शहरात रुग्णसंख्या वाढल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांना खासगी रुग्णालयांत जावे लागते.

पुणे : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून धडा घेतलेली महापालिका आता संभाव्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी सावध झाली आहे. रुग्णांवरील उपचारासाठी कायमस्वरुपी १५ कोविड रूग्णालये उभारून रुग्णांना वेळेत आणि मोफत उपचार देणार आहे. विशेषत: नव्या रुग्णालयांत लहान मुलांसाठी ५० टक्के बेड असतील. परिणामी, रुग्णालये वाढवून रुग्णांना घराजवळच उपचाराची सोय राहील. (PMC made strong preparations to prevent covid third wave informed Additional Commissioner Rubal Agarwal)

सध्या ज्या भागांत महापालिकेचे राणालये नाहीत, अशा परिसरात नव्याने उपचार व्यवस्था राहणार आहे. रुग्णांसाठी बांधलेल्या मात्र आता वापराविना पडून असलेल्या इमारती, अन्य रिकाम्या इमारतीत ही रूग्णालये सुरू होणार आहे. त्यातून महापालिकेला तीन हजार बेड उपलब्ध होतील. म्हणजे, मोफत उपचारासाठी महापालिकेकडे चार हजार बेड उपलब्ध होतील.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढून ती आठ हजारापर्यंत गेली. एवढ्या रणसंख्यसाठी पुरेशी उपचार व्यवस्था नसल्याने रुणांचे हाल झाले. त्यात पहिल्या लाटेनंतर आरोग्य व्यवस्था विस्तारण्यात महापालिका कमी पडल्याचे गेल्या दोन महिन्यांत दिसून आले आहे. पुढच्या काही दिवसांत तिसरी लाट येऊन तित लहान मुलांना सर्वाधिक लागण होण्याचा अंदाज असल्याने ही बाब आरोग्य खात्याने गांभीरतेने घेतली आहे. त्यासाठी महापालिका हक्काचे रुग्णालये सुरू करून त्यातून पाच हजार रुग्णांना सामावून घेण्याचे नियोजन करीत आहे.

शहरात रुग्णसंख्या वाढल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा अपुरी ठरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांना खासगी रुग्णालयांत जावे लागते. परंतु, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, इंजेक्शनच्या टंचाईमुळे रुगणांचे हाल झाले, तर या सुविधा कमी पडत असल्याने खासगी रुग्णालयांनी रुग्ण दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली होती अशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून महापालिका आपल्याकडची यंत्रणा वाढवत आहे.

शहरात महापालिकेच्या रुग्णालयात जम्बोसह दीड हजार बेडची व्यवस्था आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग पाहता ही संख्या कमी असल्याने रुग्णालयांचीच संख्या वाढविण्यात येईल. त्यात एका ठिकाणी १०० ते २५० बेड उपलब्ध करून पुणेकरांसाठी नव्याने तीन हजार बेड मिळतील. ज्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही.

- रुबल अग्रवाल, अतिरिक्त्त महापालिका आयुक्त

पुण्यात सध्या रुग्णसंख्या कमी असली तरी पुढच्या महिन्यांत म्हणजे काही व्यवहार सुरू केल्यानंतर ग्णसंख्या दोन हजारापर्यंत जाऊ शकते. त्यशिवाय तिसऱ्या लाटेतही संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे आतापासूनच बेड वाढविण्याचे नियोजन आहे.

- डॉ. संजीव वावरे, प्रमुख, साथरोग नियंत्रण विभाग, महापालिका

महापालिकेच्या डॉ. नायडू, दळवी, बाणेरमधील (कोविड हॉस्पिटल) रुग्णालयांत स्वत: चे ऑक्सिजन प्रकल्प उभारले आहे. ज्यामुळे रुग्णांना चोवीस ऑक्सिजन उपलब्ध होईल आणि उपचारांत अडचणी येणार नाहीत. नियोजित १५ रुग्णालयांतही अशाच प्रकारचे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

नव्या रुग्णालयांतील सोयी

- तीन हजार बेड

- ऑक्सिजन प्रकल्प उभारणार

- पुरेसे मनुष्यबळ

- लहान मुलांसाठी ५० टक्के बेड

- औषधांचा पुरेसा साठा

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी

SCROLL FOR NEXT