PMC Pune is ignoring the Dangerous dividers in Dhayari  
पुणे

धायरीतील धोकादायक दुभाजकामुळे नागरिकांच्या जीवाला धोका

ब्रिजमोहन पाटील

पुणे : धायरी फाटा ते धायरी गाव या रस्त्याचे रुंदीकरण अर्धवट असताना तेथे दुभाजक लावल्याने वारंवार अपघात घडत आहेत. यात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. हे दुभाजक लावू नयेत यासाठी विरोध करूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने हा वेळकाढूपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 
धायरी फाटा ते धायरी या दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून रस्ता रुंदीकरण सुरू आहे. पण अद्याप पूर्ण जागा ताब्यात आलेली नाही. महापालिकेने तेथील मोठे झाडं काढून टाकली, त्यानंतर काही ठिकाणी जमेलतसा पादचारी मार्ग बांधला आहे. या अडीच ते तीन किलोमीटर दरम्यान ७० गल्ल्या आहेत, रस्ता अरूंद असल्याने तेथे लोखंडी दुभाजक नको अशी मागणी करून ही महापालिकेने दुभाजक लावले, ते सदोष पद्धतीने व मध्यभागी न लावल्याने एका बाजूला रस्ता मोठा तर दुसऱ्या बाजूला छोटा अशी स्थिती आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. या लोखंडी दुभाजकास रिफ्लेक्टर नाहीत व नेव्ही ब्लू रंग लावला असल्याने रात्रीच्या वेळी हे दुभाजक दिसत नाहीत. त्यामुळे दर १०-१५ दिवसाला अपघात होऊन वाहनचालक जखमी होत आहेत, वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी केल्या तरी महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. 

पहिल्या बायकोचा संशयास्पद मृत्यू, दूसरीचा पैशांसाठी छळ तर तिसरीला

शिवसेनेचे विभाग प्रमुख महेश पोकळे म्हणाले, "आत्तापर्यंत पाच ते सहा अपघात होऊन सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हे दुभाजक सदोष आहेत, या रस्त्यावर त्यांची गरज नाही पण लाखो रुपये खर्च केले आहेत. याबाबत तक्रारी करून ही सुधारणा केली जात नाही नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केला जात असल्याने अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल केला जावा. 

उपअभियंता विठ्ठल इंगवले म्हणाले, "नागरिकांची मागणी होती म्हणून दुभाजक बसवले आहेत. गल्ल्या जास्त असल्याने चार पाच गल्ल्यांसाठी एक पंक्चर ठेवले जाणार होते. पण ते शक्य झाले नाही. रस्त्यावर रिफ्लेक्टर लावले होते, ते निघाल्याने पुन्हा लावण्यात येणार आहेत. तसेच दुभाजकाचा पांढरी निळ्या रंगाऐवजी दुसरा रंग मारण्यात येणार आहे. त्यामुळे दुभाजक दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लैंगिक शोषणाचे ५८ व्हिडिओ; अनेक महिला सेलिब्रिटींचा सहभाग, कोण आहे अशोक खरात? बाहेर लोक बसलले असताना, आत कॅबीनमध्ये करायचा चाळे

Stock Market Today: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1600 अंकांनी खाली; HDFC ला मोठा धक्का

आपला माणूस शिवचा मराठी इंडस्ट्रीत दमदार कमबॅक ! मी धुरंधर गाणं होतंय सोशल मिडियावर ट्रेंड

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारकडून एसआयटी स्थापन

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

SCROLL FOR NEXT