PMC will admit each patient government or private hospital  
पुणे

पुण्यात प्रत्येक कोरोना रुग्णाला मिळणार बेड; महापालिकेने घेतली जबाबदारी

उमेश शेळेके

पुणे : रुग्णालयात बेडस्‌ मिळत नाहीत, तातडीने दाखल करून घेतले जात नाही,या तक्रारींवर आता महापालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी असो की, खासगी रुग्णालय प्रत्येक रुग्णाला केंद्रीय पद्धतीने रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला बेडस्‌ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिकेने स्वत:वर घेणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  
 
मुंबईच्या धर्तीवर ही केंद्रीय पद्धत पुण्यातही राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नुकतीच महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या पद्धतीवर चर्चा झाली. लवकरच ही पद्धत पुण्यात दोन पातळ्यांवर राबविण्याचा विचार सुरू आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर ही योजना आणि त्यानंतर महापालिकेच्या स्तरावर रुग्णांना बेडस्‌ उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात आला आहे. 

खासगी रुग्णालयांमध्ये बेडस्‌ उपलब्ध होत नाही. दाखल करून घेतले जात नाही, अशा अनेक तक्रारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. अनेकदा आवश्‍यकता नसतानाही काही जण विनाकारण रुग्णालयातील बेडस्‌ अडवून बसले आहेत. त्यामुळे देखील अतिजोखमीच्या रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मुंबई मध्ये सरकारी अथवा खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी केंद्रीय पद्धत राबविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना देखील रुग्णालयात दाखल होण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही. तसेच अतिजोखमीच्या रुग्णांनाही तातडीने दाखल करून उपचार मिळण्यास मार्ग मोकळा होणार आहे. 

Video : मान-प्रसिद्धी देऊ शकत नाही दोनवेळची भाकर; कलाकारांवर आली बोंबिल-सुकट विकण्याची वेळ!

''मुंबईत कोरोना विषाणूचा उद्रेक नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना आता पुण्यात करण्याचे विचाराधीन आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पद्धतीने रूग्णाला दाखल करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे.''
- डॉ नितीन बिलोलीकर ( आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT