पुणे : कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा, महापालिका, सरकारी रुग्णालयांतील तोकडी आरोग्य यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा यामुळे या रुग्णालयांतील उपचार व्यवस्था ‘क्रिटिकल’ होत आहे. परिणामी या रुग्णालयांत आता खासगी रुग्णालयांतील तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. यामागे रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून, मृत्यूदर कमी करण्याचा उद्देश आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर ‘जम्बो’सह बाणेरमधील कोविड हॉस्पिटल महापालिकेच्या डॉ. नायडू, दळवी, लायगुडे आणि बोपोडीतील खेडेकर रुग्णालयात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सोय केली आहे. बेडही वाढविण्यात आले आहेत. मात्र, लसीकरणापासून ‘होम आयसोलेश’मध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या कामामुळे महापालिकेच्या रुग्णालयांत मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यातही तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे शक्य होत नसल्याचे महापालिकाच सांगत आहे.
रुग्णालयात दाखल होऊनही उपचार मिळत नाहीत, डॉक्टर वेळेत येत नाहीत अशा तक्रारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या आहेत. त्यावर उपाय म्हणून आता खासगी रुग्णालये आणि एजन्सीमधील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेण्याची भूमिका महापालिकेच्या आरोग्य खात्याने घेतली आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांवरील उपचारांना वेग येण्याची शक्यता आहे.
''सध्याच्या स्थितीत महापालिकेकडील डॉक्टर व परिचारिकांची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. रुग्ण दाखल होताच, त्याच्यावर लगेचच योग्य उपचार करता येतील. विशेषत: अतिदक्षता विभागातील तज्ज्ञांना प्राधान्याने सामावून घेण्यात येणार आहे.''
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.