pmp bus.jpg 
पुणे

तीन किलाेमीटरनंतर मिळते बस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हिंगणे खुर्द परिसरातील मुख्य रस्त्यांवरील पीएमपी सेवा गेल्या सात महिन्यांपासून बंद केली असल्याने येथील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महादेवनगर, समर्थनगर, गणेश कॉलनी, तुकाईनगर, साईनगर, दामोदरनगर येथील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

पीएमपी बस सकाळी एकदाच येते, त्यानंतर दिवसभरात एकही बस नाही. गेल्या सात महिन्यांपासून बससेवा बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. विठ्ठलवाडी ते महादेव नगर, तुकाईनगर या परिसरात राहणाऱ्या लोकांना नाइलाजाने चालत व रिक्षाने मुख्य सिंहगड रस्त्यावर हिंगणे येथे यावे लागते व बस पकडावी लागते.

या भागात मध्यमवर्गीय, नोकरी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दररोज प्रवास करताना त्यांना जास्त किंमत मोजावी लागते. खिशाला बसणारी ही झळ काहींना न परवडणारी असल्याने 2 ते 3 किलोमीटर चालत जाऊन सिंहगड रस्त्यावर किंवा वडगाव येथे बस पकडावी लागते. पूर्वी उभारलेले बसथांबे धूळ खात पडले आहेत. त्यांच्यावर केलेल्या खर्चाचा हिशेब आज येथील नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. 
मोठ्या पीएमपी बसऐवजी तेजस्विनी, इंद्रधनुष्य लिंकसारख्या लहान बस चालू करा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. बंद असलेल्या पीएमपीवर व प्रशासकीय यंत्रणेवर असणारा राग व नाराजी नागरिकांनी "सकाळ'कडे स्पष्टपणे नोंदवली.
 
बसच्या फेऱ्या कमी असल्या तरी चालतील; पण त्या सुरू होणे गरजेचे आहे. कमीत कमी सकाळी व सायंकाळी त्या सुरू असाव्यात. दुपारी प्रवासी वाहतूक कमी असते, त्या वेळेस बस बंद ठेवाव्यात. पीएमपीच्या निष्काळजी व मनमानी कारभाराचा फटका येथील नागरिक सहन करत आहेत. 

पीएमपीचे पीआरो सुहास गायकवाड यांना संपर्क केला त्यांनी फोन उचलला नाही. तर दुसरे अधिकारी सुनील गवळी यांनी माहिती देऊन माझा कोट नका टाकू, अशी प्रतिक्रिया दिली. 

मी फॅब्रिकेशनचे दुकान चालवतो. पीएमपी सेवा बंद असल्याने काही किलोमीटर चालून हिंगणे येथून बस पकडावी लागते. माझ्यासारख्या अनेक वृद्धांना हा त्रास सहन करावा लागतो. 
भीवाजी साळुंके, नागरिक, हिंगणे खुर्द 

पुण्यात जाण्यासाठी परिसरातील माझ्यासारखे अनेक नागरिक पीएमपीने प्रवास करतात. मात्र सेवा बंद असल्याने चालत अथवा रिक्षाने सिंहगड रस्त्यावर जाऊन बस पकडावी लागते. महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून बससेवा पूर्ववत करावी. मोठ्या बसऐवजी लहान बस तरी सोडल्या जाव्यात. 
- बापूराव ओव्हाळ 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT