PMP Bus
PMP Bus 
पुणे

पीएमपी खासगीकरणास मजदूर संघाचा विरोध

सकाळवृत्तसेवा

पुणे - पीएमपी मार्गांच्या खासगीकरणाच्या भाजपच्या प्रस्तावाला संघपरिवारातील भारतीय मजदूर संघाशी संलग्न पीएमपी कामगार संघानेही विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावाच्या विरोधात संघाने कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली असून, त्यानुसार २ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. पीएमपी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी उपस्थित राहण्याचा आदेश कामगार आयुक्तांनी दिला आहे. 

कोथरूड-स्वारगेट, कोथरूड-पुणे स्टेशन आणि वडगाव शेरी-पुणे स्टेशनदरम्यानच्या मार्गांवर एसी ३० बसद्वारे तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी वाहतूक करण्याचा प्रस्ताव फोर्स मोटार्स कंपनीने महापालिकेला दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले त्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पीएमपीएमएल कामगार संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम लाखवडे आणि सरचिटणीस दीपक कुलकर्णी यांनी या प्रस्तावाविरोधात कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली आहे.

पीएमपीची स्थापना कंपनी कायद्यान्वये झाली असून, शहरातील प्रवासी वाहतूक या संस्थेची जबाबदारी आहे. खासगी ठेकेदारांची त्यासाठी मदत घ्यायची असेल, तर त्यांची वाहतूक पीएमपीच्या अंतर्गत असली पाहिजे; तसेच कामगार संघटनांशीही याबाबत चर्चा करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, असे संघाने तक्रारीत म्हटले आहे.

माजी अध्यक्षांचाही विरोध 
पीएमटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब अमराळे यांनीही खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. पीएमपी ठेकेदारांच्या ताब्यात देण्याचा डाव काँग्रेस यशस्वी होऊ देणार नाही. खासगीकरणामुळे कर्मचारी रस्त्यावर येतील. त्यामुळे या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, असेही त्यांनी पीएमपीच्या अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT