PMPML sakal
पुणे

PMP Bus : पीएमपी उभारणार ३०० आच्छादित बस थांबे

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पीएमपी पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० आच्छादित बस थांबे उभारणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील प्रवाशांसाठी पीएमपी पहिल्या टप्प्यात सुमारे ३०० आच्छादित बस थांबे उभारणार आहे. त्यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे पीएमपी प्रशासनाने म्हटले आहे. हे काम अल्पावधीत सुरू होणार आहे.

आच्छादित बस थांब्यांअभावी प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे ‘सकाळ’ने प्रशासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेतली आहे. पीएमपीच्या सुमारे दोन हजार बसमधून दररोज ११ लाख प्रवाशांची ३७५ हून अधिक मार्गांवर वाहतूक होते. शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे पाच हजार बस थांबे आहेत.

त्यातील ११३० थांबे आच्छादित आहेत. आता ‘बांधा- वापरा- हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर ३०० थांबे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदार खर्च करणार असून त्यावर त्याला जाहिरातही करता येईल. त्यासाठी पीएमपीने १५ वर्षांचा करार केला आहे.

पहिल्या टप्प्यात ९० दिवसांत ५० थांबे उभारणार असून उर्वरित आठ ते दहा महिन्यांत पूर्ण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Elections: प्रचाराला आणलेल्या महिला प्रतिस्पर्धी उमेदवाराने पळवल्या, पण पैसे न दिल्याने तुफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

US Tariff On India : रशियन तेलावरून वाद पेटला; भारतावर 500% टॅरिफ? ट्रम्प यांचा मोठा निर्णय

IND vs NZ : तिलक वर्माच्या जागी T20 संघात कोणाला मिळणार संधी? ऋतुराज गायकवाडसह मुंबईकर फलंदाज शर्यतीत, कोण मारणार बाजी?

पुण्यात तडीपार माजी आमदार भाजप उमेदवाराच्या प्रचारात; काँग्रेस नेत्यानं CCTV फूटेज दाखवत केले आरोप

ZP Election : झेडपी निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार; १२ जिल्ह्यांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT