पुणे

वाघोली-राहू मार्गावर शनिवारपासून पीएमपीएल बससेवा होणार सुरू

प्रा. संतोष काळे

राहू : वाघोली-वाडेबोल्हाई मार्गे - राहूला पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएल) बससेवा शनिवार (ता. १२) डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती पीएमपीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्ह्टले आहे.

बससेवा सुरू होण्यासाठी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे राहूचे सरपंच दिलीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते शांताराम बांदल यांनी सांगितले. बससेवा सुरू होण्यासाठी राहू ते वाघोली दरम्यान असणा-या ग्रामपंचायतीनी तसेच श्रीनाथ म्ह्स्कोबा साखर कारखान्याने प्रस्ताव अनेकदा दिले होते.

राहू ते वाघोली तीस किलोमाटर अंतर आहे. यामार्गे एकहजाराहून अधिक विद्यार्थी पुणे, वाघोलीच्या दिशेने महाविद्यालयीन शिक्षणासाठी जातात. त्यामुळे आता गैरसोय टळणार आहे. राहूवरून वाघोलीमार्गे पुण्याला दैनंदिन कामकाज, शासकीय, खासगी नोकरदारांची संख्या जादा आहे. या मार्गावरील दौंड, हवेली, शिरूर तालुक्यातील समावेश असलेल्या गावांमधील नागरिकांची गैरसोय टळणार असल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

गेल्या अनेक वर्षांपासून मी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिका-यांना भेटून पाठपुरावा केला. शालेय विद्यार्थ्यी, नागरिकांच्या गैरसोयीबद्दल आवाज उठवला. माझ्या प्रयत्नाला अखेर यश आले. राहू परिसराचे शहरीकरण झपाट्याने वाढणार आहे. - शांताराम बांदल, सामाजिक कार्येकर्ते

'सकाळ' च्या वृत्ताची दखल- राहू ते वाघोली मार्गावर पीएमपीलची बससेवा सुरू होण्यासंदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थी, वयोवृद्ध प्रवाशी, दैनंदिन नोकरदार यांना होत असलेल्या त्रासांबद्दल  'सकाळ' ने नेहमीच सडेतोड वृत्तांकन केल्यामुळे संबंधीत विभागाला जाग आली. त्यामुळे 'सकाळ' चे कौतुक होत आहे.

बसथांबे-: वाघोली (केसनंदफाटा), जोगेश्वरी विद्यालय, टाटा याजाकी कंपनी, केसनंद गाव, वाडेगाव, वाडेबोल्हाई, कलकवाडी, अष्टापूर फाटा, न्हावी फाटा, शिंदेवाडी, मेमाणवाडी फाटा, सांगवी सांडस, विठ्ठलवाडीफाटा, देवकरवाडी, पाटेठाण, टाकळी भीमा, डुबेवाडी, पिलाणवाडी, सोनवणे डेअरी फार्म, सोनवणेमळा, समतानगर, महात्मा फुले चौक, राहू.
 - बसचे वेळापत्रक - पुणे स्टेशन वरून राहू मार्गे सकाळी ५, ६, ७, दुपारी १२.३०, १.३०, २.३०, ३.३०, रात्री ८ वाजता मुक्कामी,  ः- वाघोलीवरून राहूला बस जाण्यासाठी सकाळी ५.४५, ६.४५, ७.४५, ८.१५, ९.१५, १०.१५, ११.१५, दुपारी १.१५, २.१५, ३.१५, ४.१५, ४.४५, ५.४५, ६.४५, ८.४५ ** राहूवरून वाघोली पर्यंत सकाळी ६, ७, ८, ९, १०, ११, दुपारी १२, १, २.३०, ३.३०, ४.३०, ५.३०, राहूवरून पुणे स्टेशन सायंकाळी ६.३०, ७.३०, ८.३०    

(संपादन : सागर डी. शेलार) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT