pmpml chinese electric buses proposal stay municipal corporation
pmpml chinese electric buses proposal stay municipal corporation 
पुणे

आमच्या पुण्यात चिनी बसेस नकोच; महापालिकेचा मोठा निर्णय!

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भारत-चीन सीमेवर तणाव आहे. चिनी सैनिकांच्या हल्ल्यात 20 भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. परिणामी देशभरात चिनी वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप घेतला जात आहे. त्यांना विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतही महत्त्वाचा निर्णय झालाय.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पीएमपीच्या ताफ्यात 350 ई-बसेस घेण्याच्या ठरावाला पीएमपीच्या संचालक मंडळाने सोमवारी स्थगिती दिली.  त्याचप्रमाणे 50 मिडी बससेसची खरेदी पुणे महापालिका करणार असल्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, पीएमपीचे संचालक शंकर पवार, पीएमपीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, सहव्यवस्थापकीय संचालक अजय चारठाणकर आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

पीएमपीच्या चालकांना सर्व शासकीय खात्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचा प्रस्ताव या वेळी मंजूर करण्यात आला. ज्या शासकीय विभागांकडून  मागणी येईल त्यांना पीएमपी'चे चालक पुरविण्यात येणार आहेत. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने आणि निविदा प्रक्रियेमध्ये चिनी कंपन्या सहभागी होण्याची शक्यता असल्याने  350 ई बस घेण्याचा ठराव रद्द करावा, असा प्रस्ताव होता. परंतु, या बाबत अभ्यास करून निर्णय घेऊ, तो पर्यंत निविदा प्रक्रिया लांबणीवर टाकू, असे संचालक मंडळाने सांगितले. शहराच्या मध्य भागात 10 रुपयांत बस प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी 50 बसची खरेदी पुणे महापालिका करेल, असे महापौर मोहोळ यांनी संचालक सांगितले. त्या नुसार आता पुढील प्रक्रिया होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT