paud police 
पुणे

लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच हातात पडली पोलिसांची बेडी 

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मोकाअंतर्गत गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीने लाॅकडाउनमुळे कसलाही गाजावाजा न करता साधेपनाने लग्न करायचे ठरवले...मात्र, त्याची खबर पोलिसांनी वेळीच लागली आणि लग्नाच्या बेडीत अडकण्यापूर्वीच त्याच्या हातात पोलिसांची बेडी पडली. अक्षय रोहिदास पडळघरे (वय २३, रा. पडळघरवाडी- रिहे, ता. मुळशी) असे या आरोपी नवरदेवाचे नाव आहे.

कोरोनाच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे राज्यात लाॅकडाऊन सुरू आहे. लाॅकडाऊनच्या नियमानुसार सद्यस्थितीत लग्न समारंभ, वाढदिवस, सभा-संमेलनं अशा जाहीर कार्यक्रमांवर पूर्णत: बंदी आहे. या स्थितीचं भान राखत काही जोडप्यांनी अत्यंत साधेपणाने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकून घेतल्याची अनेक उदाहरणं आपण मागच्या काही दिवसांमध्ये बघितली, वाचली असतील. अशाच पद्धतीने कसलाही गाजावाजा न करता साधेपनाने लग्न करण्याचे अक्षय रोहिदास पडळघरे या आरोपीने ठरवले. त्याच्यावर पौड पोलीस स्टेशन हद्दीतील कलम ३०७ व मोकाअंतर्गत गुन्हा दाखल आहे. 
तो गेल्या पाच महिन्यांपासून मोकाअंतर्गत गुन्ह्यात फरारी आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मात्र, तो लग्न करणार असल्याची खबर पोलिस हवालदार अब्दुल शेख यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस अधिक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलिस हवालदार अब्दुल शेख, पोलिस हवालदार बाबा शिंदे, पोलिस शिपाई सुहास सातपुते, पोलिस नाईक जय पवार, पोलिस हवालदार संतोष कुंभार यांचे पथक तात्काळ लग्नाच्या ठिकाणी पाठविले. या पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा लावून आरोपीस अटक केली. 

या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलिस अदिकारी डॉ. सई भोरे पाटील या करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT