Crime 
पुणे

जबरी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मुद्देमाल केला जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सराफ व्यावसायिकाला धमकावत जबरी चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फरासखाना आणि विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन लाख 34 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संदीप ऊर्फ सॅन्डी सुरेंद्र नायर (वय 26, रा.बिबवेवाडी) आणि रोहित ऊर्फ पिल्या चंद्रकांत जानराव (वय 21, रा.अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र रुपचंद्र राठोड (वय 30, रा. शिवाजीनगर) हे तीन सप्टेंबर रोजी चहाची टपरी शोधत चालले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांची कॉलर पकडून दमदाटी करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील सोन्याचे कडे, रोख रक्कम आणि बॅंकेचे कार्ड असा दोन लाख 80 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याची माहिती पोलिसांना समजतात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढण्यात आला. नायरसह घटनास्थळावर आणखी एक आरोपी रवी ऊर्फ बल्ली कांबळे उपस्थित होता. त्याचाही शोध घेण्यात येत आहे. अटक केलेले दोघेही आरोपी सराईत असून त्यांच्याविरुद्ध खून, दरोडा, दरोड्याची तयारी, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, पोलिस कर्मचारी शरद वाकसे, अभय काळे, धीरज पवार, सचिन जगदाळे, गणेश पालवे यांच्या पथकाने केली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक युवराज पाटील करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! खडकवासला धरणसाखळीत अवघ्या १३ तासांत २.३६ टीएमसीची भर, वेगाने वाढतोय जलसाठा

Mumbai Local: पावसाचा हाहाकार! सलग दुसऱ्या दिवशी पश्चिम रेल्वे विस्कळीत, लोकल अर्धा तास उशिराने

Latest Marathi News Update: आंबेनळी घाट महिनाभर बंद, स्थानिकांचा विरोध

मृत्यूपूर्वी धर्मेंद्र हेमा मालिनी यांना काय म्हणाले होते? अभिनेत्रीचा खुलासा; सांगितलं ते गेल्यानंतर कसं राहतंय कुटुंब

Tukaram Mundhe Action : तुकाराम मुंढेंचा दणका! आता किराणा दुकानांतून सुटे खाद्यतेल अन् विनालेबल फरसाण गायब; व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT