crime 
पुणे

उरुळी कांचनच्या भर चौकात पोलिसाला टोळक्‍याकडून बेदम मारहाण 

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्‍यातील उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात किरकोळ कारणावरून एका तरुणास होत असलेली मारहाण रोखण्यासाठी गेलेल्या जिल्हा (ग्रामीण) पोलिस पोलिस दलातील एका कर्मचाऱ्यास आठ ते दहा जणांच्या टोळक्‍याने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता. 25) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तसेच, या टोळक्‍याने तळवाडी चौकातील एका महिलेसही शिवीगाळ केली आहे. 

उरुळी कांचन येथील या घटनेत सोमनाथ शिवाजी चितारे (रा. उरुळी कांचन) या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाली आहे. ते सध्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी शुभम ऊर्फ दाद्या अशोक कानकाटे (रा. इनामदारवस्ती, कोरेगाव मूळ ता. हवेली) व अजय रामचंद्र ठवरे (रा. उरुळी कांचन) या दोघांसह आठ अनोळखी, अशा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कानकाटे व ठवरे या दोघांना अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील तळवाडी चौकात शिंदवणे रस्त्यावर सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका तरुणास काही लोक बेदम मारहाण करत असल्याची खबर उरुळी कांचन पोलिस चौकीत एकाने फोनवरून दिली. या माहितीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने सोमनाथ चितारे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोचले. त्या ठिकाणी कानकाटे व ठवरे व त्यांचे आठ ते दहा सहकारी लाकडी दांडके व लाथाबुक्‍क्‍यांनी नीलेश दत्तात्रेय भोसुरे (वय 27, रा. धानोरे, ता. शिरूर) या तरुणास मारहाण करत असल्याचे आढळून आले. 

 रोखण्यासाठी पोलिस गणवेशात असलेले सोमनाथ चितारे पुढे गेले असता शुभम कानकाटे व अजय ठवरे व त्यांच्या साथीदारांनी चितारे यांच्यावर हल्ला चढविला. ते पाहून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कानकाटे व ठवरे यांनी मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांना शिवीगाळ करून घटनास्थळावरून हाकलून देण्याचा प्रयत्न केला. तसेच, कानकाटे याने चितारे यांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. मात्र, चितारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या हिमतीने कानकाटे व ठवरे यांना पकडले. मात्र, त्यांचे उर्वरित साथीदार पळून गेले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT