Police_Bloacked 
पुणे

खडकवासला परिसरात पोलिसांची नाकाबंदी; मद्यपींवर पोलिसांची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी (पुणे) : पुणे-पानशेत रस्त्यावर खडकवासला धरण चौकात हवेली पोलिसांनी कडक नाकाबंदी केली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास चालकासह इतर सहप्रवाशांवरही कारवाई करण्यात येत आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी आणि इतर पर्यटक खडकवासला, सिंहगड, पानशेत या भागात येतात. फार्म हाऊस, रिसॉर्ट अशा ठिकाणी मोठ्या पार्ट्यांचे आयोजन या भागात होत असते. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यामुळे मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर मर्यादा आल्या आहेत.

काही उपद्रवी पर्यटक, मद्यप्राशन करुन वाहन चालविणारे तरुण-तरुणी यांच्याकडून अपघात किंवा इतर काही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून  हवेली पोलिसांकडून खडकवासला धरण चौकात तपासणी केली जात आहे. तसेच एक पथक नांदेड फाट्यापासून पानशेत जवळील आंबी गावापर्यंत सतत गस्तीवर ठेवण्याचे नियोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT