Crime Sakal
पुणे

पुणे : गुन्हेगाराला अटक करण्यास गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने वार

सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हेगाराने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सराईत गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हेगाराने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मंगळवार पेठेत रविवारी सायंकाळी पाच वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी फरार झाला आहे.

कुमार भागवत चव्हाण (वय २१, रा. मंगळवार पेठ), असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर प्रतीक पृथ्वीराज कांबळे (रा. मंगळवार पेठ), असे पळून गेलेल्या संशयिताचे नाव असून त्याला यापूर्वी तडीपार करण्यात आले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नरेश केशव वाडेवाले यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झोपडपट्टीतील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी मंगळवार पेठेत बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांशी दोघांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित तरुण हे चव्हाण व कांबळे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे वाडेवाले हे आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवार पेठेत आरोपींना पकडण्यासाठी गेले. त्या वेळी कांबळे याने पोलिसांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने वाडेवाले यांच्यावर कोयत्याने वार केला.

वाडेवाले यांनी त्यांच्याकडे असलेल्या लाठीने ते वार झेलून त्याच्या हातातील कोयता हिसकावून स्वतःच्या ताब्यात घेतला. त्या वेळी रिक्षात बसलेल्या चव्हाणने पोलिसांना विटा फेकून मारल्या. या घटनेत पोलिस जखमी झाले. या घटनेनंतर कांबळे पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT