police 
पुणे

पुण्याच्या जलवाहिनी कामासाठी खेडमध्ये पोलिस बंदोबस्त

रुपेश बुट्टे

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावरून पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम उद्यापासून (ता. १४) पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसनासह अन्य प्रश्न प्रलंबित असल्याने वेळोवेळी हे काम बंद पाडले होते. काम बंद करू नये म्हणून आज काही शेतकऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजवजा इशारा दिला आहे.

अरे वा, 95 वर्षांच्या आजीबाईंची कोरोनावर मात 
        
पुनर्वसनासह अनेक मागण्या प्रलंबित असल्याने आजवर अनेक वेळा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जॅकवेल आणि जलवाहिनीची कामे बंद पाडली होती. परंतु, त्यानंतर सर्वानुमते एक किलोमीटर जलवाहिनीचे काम बंद ठेऊन अन्य कामे मार्गी लावण्याचे ठरले होते परंतु, आता शासन पोलिस बंदोबस्त लावून बळजबरीने हे काम देखील सुरू करीत असल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत याला विरोध करणार असल्याचे बोलले जात आहे. आता एक किलोमीटरऐवजी २०० मीटरचे बाकी ठेवू, असे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पात्र शेतकऱ्यांना जमीन वाटप करावे, अपात्र शेतकऱ्यांना योग्य पॅकेज द्यावे, तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवावा, या प्रमुख मागण्यांसह प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकऱ्या द्याव्यात, न्यायालयाच्या आदेशानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचे ताबे मिळावेत, वाढीव मोबदला मिळावा आणि बाधित गावांना नागरी सुविधा मिळाव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलन करून या पूर्वी काम बंद पाडले आहे.

आमचे रखडलेले पुनर्वसन करा, नाही तर जलसमाधी घेऊ, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. पूर्वी देखील एका तरुण शेतकऱ्याने जलसमाधी घेतली आहे. तर, काही दिवसांपूर्वी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी महिला, मुलाबाळांसह विविध गावात पाण्यात उतरून आंदोलन केले होते. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून राजगुरूनगर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम आल्यानंतर त्यांनी काम काही काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु आता पुन्हा काम सुरू होणार असल्याने संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. याबाबत चाकण पोलिसांनी काही आंदोलन प्रमुखांना नोटीस देऊन कामात अडथळा आणू नये, अशी सूचना केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Latest Marathi News Live Update : मागाठाणेतील आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मनसेचा निषेध

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

New Year 2026 Skin Care: नववर्षात हवी ग्लोइंग स्किन? मग आत्ताच सुरू करा 'हा' 2 महिन्यांचा स्किनकेअर प्लॅन

SCROLL FOR NEXT