somnath panchal
somnath panchal 
पुणे

पोलिस उपनिरीक्षक पांचाळ यांची सायकलवरून गस्त (व्हिडिओ)

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : दिवसा किंवा रात्री गस्त घालत असताना पोलिस लहान गल्ल्यांमध्ये जातच नाहीत. नेमके तेथेच गुन्हे घडतात, अशा तक्रारी सातत्याने नागरीकांमधून केल्या जातात. यावर मंचर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी शक्कल लढविली आहे. घरापासून पोलिस ठाणे व मंचर शहरात सायकलवरून गस्त घालण्यास त्यांनी सुरवात केली आहे. सायकलवरून प्रवास करताना लोक त्यांच्याकडे कुतुहलाने पाहतात.

मंचर (ता. आंबेगाव) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पृथ्वी सायकल विक्री केंद्र सुरु झाले आहे. पांचाळ यांनी शोरूममधून सायकल खरेदी केली. घरातून पोलिस ठाण्यापर्यंत व मंचर शहरात सायकलहूनच त्यांनी फिरण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, '20 ते 25 वर्षापूर्वी पोलिस कर्मचारी व अधिकारी सायकलवरून प्रवास करत होते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वजन दुचाकी वाहनाचा वापर करतात. इंधनाचे वाढलेले दर परवडत नाहीत. तसेच व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. शरीर सुदृढ राहण्यासाठी सायकलचा वापर प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला व अधिकाऱ्याला करणे गरजेचे आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील सायकलचा वापर करतात. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी तंदुरस्त आहे. त्यांचाच आदर्श घेऊन मीही जास्तीत जास्त सायकलवरून प्रवास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या प्रवासामुळे मन प्रसन्न राहते. गल्ली बोळातही फिरता येते. सामान्य नागरिकांशी थेट संपर्क येतो. नागरिकांनाही आमच्याशी बोलताना दुरावा जाणवत नाही. व्यापारी वर्गातही सायकल वापराबाबत जनजागृती करणार आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT