crime.jpg 
पुणे

पुणेकरांनो, विनाकारण घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे लागु केलेल्या लॉकडाऊनमध्येही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. मागील चार दिवसात संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठशे जणांवर पोलिसांनी कारवाई केली. तर चारशे वाहने जप्त केली. दरम्यान पुणे पोलिसांनी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणासाठी 14 हजार 219 नागरीकांना पास उपलब्ध करुन दिला.

शहरातील वाढत्या कोरोना संसर्गवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने 14 ते 23 जुलै या कालावधीसाठी लॉकडाउन लागू केला आहे. त्यानुसार शहरात दिवस व रात्र अशा दोन टप्प्यात नाकाबंदी करून शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर पोलिसांकडुन कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांकडून 14 ते 17 जुलै या कालावधीत संचार मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आठशे जणावर गुन्हे दाखल केले आहेत. कोणतेही कारण नसताना वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्याची सुमारे चारशे वाहने जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंग यांनी दिली.

लॉकडाऊन 14 ते 17 जुलै या पहिल्या टप्प्यात रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या  ८ हजार ६९६ नागरीकांना डिजीटल पास पुणे पोलिसांच्या सेवा कार्यप्रणालीकडुन देण्यात आले. तर अन्य अत्यावश्यक कारणासाठी ५ हजार ५२३ जणाना तत्काळ पास दिले गेल्याचे बच्चन सिंग यांनी सांगितले. पुणे महापालिकेच्या लॉकडाउन नियमावलीप्रमाणे ई कॉमर्समधील कंपन्यांना १९ जुलैपासून सेवा देता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी डिजीटल पास अद्ययावत करणे आणि नवीन पास मिळविण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या www.punepolice.in संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

Edited by : Sagar Shelar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेची तयारी! १,४५५ कोटींचे प्रकल्प, वाचा संपूर्ण यादी

Cricketer News: क्रिकेटपटूने दिली सोन्याची चेन... मात्र प्रेयसीने गहाण ठेवली; न्यायालयात पोहोचताच संपूर्ण कहाणी उलटली

खोटं रक्त आणि... असा शूट झाला 'सावळ्याची जणू सावली' मधला अमृताच्या अपघाताचा सीन; पाहा BTS व्हिडीओ

Satara News: साताऱ्यातील ‘कास’वर अवैध उत्खनन; तहसीलदारांची व्यावसायिकाला दंडाची नोटीस

Kolhapur Tourist Death : राधानगरीत Engineering महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणाचा दूधगंगेत बुडून मृत्यू; कांबळे कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

SCROLL FOR NEXT