police will scan the QR code and present 
पुणे

पोलिस लावणार क्‍यूआर कोड स्कॅन करून हजेरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलिसांना आता थर्ड आय इनहॅंन्सिग पोलिसिंग प्रिव्हींटिंग क्राइम्स युझिंग डिजिटल टेक्‍नॉलॉजी याच्या माध्यमातून क्‍यूआर पेट्रोलिंग ऍपद्वारे महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी क्‍यूआर कोड स्कॅन करून हजेरी लावता येणार आहे.

पेट्रोलिंगकरिता नेमलेले कर्मचारी व त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पेट्रोलिंग करीत. त्या वेळी त्यांना यापूर्वी तेथील रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करून त्यांना आपली उपस्थिती दर्शवावी लागत होती. पुणे पोलिसांच्या संकल्पनेतून पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत वाहतूक शाखेकडून 449, दामिनी मार्शलकडून 470, पोलिस स्टेशनकडून दोन हजार 962 असे एकूण तीन हजार 881 क्‍यूआर कोड महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले आहेत. शहरात लावलेले हे क्‍यूआर कोड दामिनी मार्शल, वाहतूक शाखेकडील कर्मचारी व पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांकडून स्कॅन केले जातात. दामिनी पथकाकडून स्कॅन करण्यात आलेल्या क्‍यूआर कोडचे स्कॅनिंग गुन्हे शाखेकडून, पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांकडून स्कॅन करण्यात आलेल्या क्‍यूआर कोडचे संबंधित पोलिस ठाण्याकडून करण्यात येते.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी; तसेच पेट्रोलिंग कर्मचारी हे क्‍यूआर कोड लावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची लगेच थर्डआय प्रणालीमध्ये स्वयंचलित नोंद केली जाते; तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याबाबतचा अहवाल दिला जातो. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हे त्यांच्या स्तरावर पेट्रोलिंग करताना त्यांना प्राधान्याने ज्या ठिकाणी भेट द्यायची आहे ते ठिकाण व क्‍यूआर कोड स्कॅन करण्याचे ठिकाण, वेळेबाबत नियोजन करणे शक्‍य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ; २ लाखांचे थकीत पीककर्जाचीच माफी, अशी नसणार अट; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ, वाचा...

Quick & Easy Morning Breakfast Recipe: आठवड्याची सुरुवात करा हेल्दी नाश्त्याने ; फक्त 10 मिनिटांत बनवा 'मल्टी व्हिटामिन भेळ'

Panchang Today 30 Marach 2026 : आजचा दिवस शुभ; मुहूर्त, राहू काळ आणि उपाय जाणून घ्या

गुन्हेगारांचे धाबे दणाणले! सोलापूर पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक; जुगार अड्डे, अवैध वाळू वाहतूक, ऑर्केस्ट्रा बार, अवैध दारुनिर्मिती, विक्रीवर असणार लक्ष

MI vs KKR Live : रायन रिकल्टनच्या ८१ धावा, रोहित शर्माच्या ७८... तरीही प्लेअर ऑफ दी मॅच पुरस्कार तिसऱ्यालाच; जाणून घ्या का?

SCROLL FOR NEXT