shikrapur police 
पुणे

घरमालकांना पोलिसांची तंबी, अशी चूक केल्यास सक्त कारवाई करणार... 

भरत पचंगे

शिक्रापूर (पुणे) : कोरोनाच्या आव्हानाला सडेतोडपणे सामोरे जाताना जिल्हा पोलिसांनी आपला मोर्चा औद्योगिक क्षेत्र सुरळीत सुरू करण्याकडे वळविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी (ता. 9) सकाळी शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडीत गावात पथसंचलन करून स्पिकरवर तमाम घरमालकांना जाहीर तंबी दिली की, "पुढील तीन महिने कुणाही कामगारांना घरभाडे मागू नये, तगादा लावू नये. तसे केल्यास सक्त कारवाई करू.' 

परप्रांतियांमुळे व परजिल्ह्यातील कामगारांच्या घरवापसीमुळे औद्योगिक क्षेत्र सुनेसुने होत आहे. त्यामुळे उद्योगनगरी पुन्हा सुरळीत होणे खरोखरीच आव्हानाचे आहे. लॉकडाउन बऱ्यापैकी शिथिल होताना कामगार आपापल्या गावी निघून गेले. त्यातून कंपन्या सुरू करणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता कंपन्या पुन्हा सुरळीत चालू व्हाव्यात, यासाठी जिल्हा पोलिसांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. 

सणसवाडी येथे मोठ्या प्रमाणात कामगार खोल्या भाड्याने घेऊन राहत आहेत. त्यांनी गावी जाऊ नये, इथेच राहून कंपन्यांमध्ये रुजू व्हावे, यासाठी शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सणसवाडीत शुक्रवारी सकाळीच एक पोलिस रॅली काढून संपूर्ण सणसवाडीकरांना आवाहन केले की, "शासन आदेशाप्रमाणे पुढील तीन महिने कोणाही घरमालकांनी आपल्या भाडेकरूंना भाडे मागू नये, भाड्याचा तगादा लावू नये. या काळात कुणीही भाडेवसुली केल्यास त्यावर सक्त कारवाई केली जाईल.' 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

शिक्रापूर- सणसवाडी परिसरातील सर्व कामगार कसे येथेच राहतील आणि कंपन्या पुन्हा कशा सुरळीत होतील, यासाठी शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी प्रयत्न सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून पाच दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्‍वर्या शर्मा यांच्या उपस्थितीत जवळपास 80 कंपन्यांची बैठक शिक्रापूर पोलिस स्टेशनला घेतली. त्यावेळी सर्व कंपन्यांना आश्वासित करून कंपन्या पुन्हा सुरळीत करण्यासाठी सोबत राहण्याचा शब्द दिला. याच प्रयत्नाचा भाग म्हणून सणसवाडीत पथसंचलन झाले असून, त्याचा सकारात्मक प्रतिसाद सुरू झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर वैरागकर यांनी दिली. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT