A policeman committed suicide by hanging himself at his residence in Pune.jpg 
पुणे

धक्कादायक! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

पुणे : सोमवार पेठ पोलिस वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. कौटुंबिक कारणातून हा आत्महत्येचा प्रकार घडला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

पुण्यातील सुमारे 400 लहानग्यांची कोरोनावर मात

संजय बनसोडे (वय 40, रा. सोमवार पेठ पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलिसाचे नाव आहे. बनसोडे हे मागील तीन वर्षापासून विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी गावी गेल्या आहेत, तर मुले व आई शनिवारी रात्री त्यांच्या बहिणीकडे राहण्यास गेल्या होत्या. त्यामुळे बनसोडे घरी एकटेच होते. त्यांची आई शनिवारी रात्रीपासून त्यांना फोन करीत होती. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आपल्या शेतकऱ्याला मार्केटिंग ट्रेनिंग द्यायलाच पाहिजे, अमोल कोल्हे यांची भूमिका

रविवारी सकाळी त्यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्याना घरी जाण्यास सांगितले. ते घरी गेल्यानंतर घर आतुन बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे घराचे कौले उचकटुन पाहिली. त्यावेळी त्यांना बनसोडे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी याबाबत त्यांच्या कुटुंबीयांना व समर्थ पोलिसांना खबर दिली. त्यानंतर त्यांच्या समवेत काम करणाऱ्या विश्रामबाग पोलिसांनीही घतनास्थली तत्काळ धाव घेतली.

सासवडमध्ये आढळला आणखी एक कोरोनाबाधित 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT