Government Technical College Polytechnic College
Government Technical College Polytechnic College 
पुणे

पुण्यात रिक्त जागांमुळे पॉलिटेक्निक संस्थांना घरघर; संस्थाही पडताहेत बंद

ब्रिजमोहन पाटील

पुणे : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात (पाॅलिटेक्नीक) प्रवेश घेण्याकडे मोठी स्पर्धा असली तरी खासगी महाविद्यालयातील असुविधा, तज्ज्ञ प्राध्यापक नसणे याचा फटका या अभ्यासक्रमास बसत आहे. दरवर्षी एकुण प्रवेश क्षमतेपैकी जवळपास ५० टक्के जागा रिक्त राहात असून, संस्था बंद पडत चालल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीला थेट प्रवेश घ्यायचा आहे. तसेच शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे असे विद्यार्थी इयत्ता १०वी नंतर तंत्रनिकेतनला प्रवेश घेण्यास प्राधान्य देतात. यामध्ये सरकारी महाविद्यालय व अनुदानित   महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चांगली स्पर्धा असते.

पुण्यातील तंत्रनिकेतन संस्थेत प्रवेश घेण्यासाठी किमान ९० टक्के गुण आवश्यक असतात. तर जिल्ह्यात हे प्रमाण किमान ८० आहे. मात्र खासगी संस्थेत प्रवेश घेताना केवळ १०वी उत्तीर्ण एवढ्या एका अटीवर प्रवेश होतो. यात गुणवत्ता पाहिली जात आहे. 

 पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यात ७ शासकीय, ४ अनुदानित आणि १०५ खासगी तंत्रनिकेतन संस्था आहेत. खासगी संस्थांपैकी २० ते २५ टक्के संस्थांमध्ये पायाभूत सुविधा असल्याने तेथे बर्यापैकी प्रवेश होतात. बाकी ७५ ते ८० टक्के प्रवेश क्षमतेच्या २० टक्केही प्रवेश होत नाही अशी विदारक स्थिती आहे. त्यामुळे या संस्था बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, शासकीय व अनुदानित संस्थांमध्ये ९५ टक्क्यांपर्यंत प्रवेश होत आहेत. 
यामध्येही सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, काँप्युटर, इलेक्ट्रिकल, इनफाॅर्मेशन टेक्नॉलॉजी ब्रांचला प्रवेश मिळावा म्हणून चांगलीच स्पर्धा लागलेली असते.

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

"तंत्रनिकेतन पदविकेसाठी शासकीय व अनुदानित संस्थामध्ये प्रवेश चांगले होतात. मोजक्या खासगी संस्था चांगल्या आहेत. पण बहुतांश संस्थांमध्ये पायाभूत सुविधा, प्राध्यापक कमी असल्याने जागा रिक्त रहाण्याचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे काही संस्था बंद होत आहेत महाराष्ट्र तर काहींची प्रवेश क्षमता कमी केली जात आहे."
- दिलीप नंदनवार, उपसंचालक, तंत्र शिक्षण विभाग

चार वर्षांत १६ जागांची कपात
पुणे विभागात तंत्रनिकेतनच्या २०१६ मध्ये १४२ संस्था होत्या. तर  प्रवेश क्षमता ५१ हजार ८८९ इतकी होती. मात्र २०१९ मध्ये ११६ संस्था असून, प्रवेश क्षमता ३५ हजार ४३२ इतकी झाली आहे. गेल्या चार वर्षांत २५ संस्था आणि १६ हजार ४५७ प्रवेश क्षमता झाली आहे. 

तंत्रनिकेतन पदविकेची स्थिती आकड्यांमध्ये
२०१६
एकुण संस्था - १४२
प्रवेश क्षमता - ५१८८९
प्रवेश - २२९५७
प्रवेश टक्केवारी - ४४.२४ 


२०१७ 
एकुण संस्था - १३०
प्रवेश क्षमता - ४४७२२
प्रवेश - १९५५५
प्रवेश टक्केवारी - ४३.७२


२०१८ 
एकुण संस्था - १२३
प्रवेश क्षमता - ३८,२९९
प्रवेश - १७५८२
प्रवेश टक्केवारी - ४५.९०


२०१९
एकुण संस्था - ११६
प्रवेश क्षमता - ३५,४३२
प्रवेश - १८९४७
प्रवेश टक्केवारी - ५३.४७ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT