Pooja Chavan suicide case Maharashtra Minister Audio clip goes viral 
पुणे

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?

सकाळवृत्तसेवा

पुणे ": परळीतील टिक टॉक स्टार पुजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या आत्महत्येमध्ये विदर्भातील एका मंत्र्याचा संबध असल्याची चर्चा सुरु आहे. भाजपकडूनही तसा आरोप केला जात आहे. दरम्यान सध्या एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली असून या आत्महत्या प्रकरणाशी संबध असल्याचे चर्चा सुरु आहे. या ऑडिओमध्ये दोन व्यक्तींचे बंजारा भाषेतील संभाषण आहे, ज्यामध्ये एक तरुणी आत्महत्येचा विचार करतेय असे संभाषण आहेत. तो आवाज संबधित  मंत्र्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्यक्ती कोण आहेत? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान, या ऑडिओचा फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावरच त्याची सत्यता समोर येईल. त्यामुळे राज्यमंत्र्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये?
या ऑडिओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ''तरुणीच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार येत आहे'' असे सांगत आहे. यावरुन तरुणीने आत्महत्या करण्यापुर्वी एक व्यक्ती तिच्या सोबत होता आणि दुसऱ्या व्यक्तीला माहिती देत होता. तसेच संबधित व्यक्तींना ती तरुणी आत्महत्या करणार असल्याची माहिती होती. त्यावर,  ''त्या तरुणीला समजावून सांगा'' असेही तरुणीसोबत असलेला व्यक्ती फोनवरील व्यक्तीला सांगत होता. त्यावर फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिला डॉक्टरकडे घेऊन जा'' असे सांगते. त्यानंतर,''तुम्ही सांगत असाल तर मी डॉक्टरकडे जाते, पण नंतर मी आत्महत्या करणार'' असे तरुणी म्हणतेय असे तो व्यक्ती सांगत आहे. दरम्यान या दोन व्यक्तींमधील  बंजारा भाषेतील संवादाचे आणखी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल समोर आले आहे.  या ऑडिओ क्लिपवरुन तरुणीने आत्महत्या केल्यानंतर तिच्यासोबत एक व्यक्ती तिथेच होता. त्या व्यक्तीला फोनवरील दुसरी व्यक्ती ''तिचा मोबाईल काढून घे'' असे सांगत आहे.  

शरद पवारांच्या आधीच केला पुतळ्याच्या अनावरणाचा प्रयत्न; पडळकरांवर गुन्हा दाखल

दरम्यान, ही ऑडिओ क्लिप पुजा चव्हाणच्या आत्महत्येसंबधित असल्याची चर्चा सुरु आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे का या तपासणी होईलच. पण तोपर्यंत  या 22 वर्षाच्या पुजाने आत्महत्या का केली असेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, ही ऑडिओ क्लिप सत्यता बाहेर आल्यानंतर संबधित मंत्र्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा सध्या सुरु आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT