blood donation sakal
पुणे

पुण्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण घटल्याची माहिती पुढे आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण घटल्याची माहिती पुढे आली आहे.

पुणे - उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे (Summer Holiday) रक्तदान शिबिरांची (Blood Donation Camp) संख्या कमी झाल्याने रक्तदानाचे प्रमाण घटल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मे महिन्याच्या मध्यानंतर काही रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा (Blood Shortage) जाणवण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शहरात उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये होणारे रक्तदान शिबिर बंद आहेत. कोरोनानंतर दोन वर्षांमध्ये प्रथमच कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे नोकरदार मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. त्याचा थेट परिणाम रक्तदानाचे प्रमाण घटण्यावर झाल्याचे निरीक्षण आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नोंदविले आहे. गणपती मंडळे, ढोल-ताशा पथके यांच्याकडून रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्यांनी आता पुढे येऊन या शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन आरोग्य क्षेत्रातून करण्यात आले आहे.

यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला सुदैवाने रक्तदान शिबिरे झाली. त्यातून या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र, त्यानंतर शिबिरांचे अजून नियोजन झाले नाही. त्यामुळे रक्तसाठ्याचा अंदाज अजून येत नाही.

- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी, पुणे

अशी आहे संख्या...

  • शहरातील रक्तपेढ्या - २५

  • दररोज रक्ताची गरज - ६०० ते १००० बॅग्ज

कोरोना उद्रेकात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रक्तसाठ्याची स्थिती चांगली आहे. मागणीप्रमाणे रक्तपुरवठा करता येत आहे.

- डॉ. स्मिता जोशी, रक्तपेढी प्रमुख, सह्याद्री रुग्णालय

असा झाला परिणाम...

  • माहिती तंत्रज्ञानासह विविध कंपन्यांमधून नियमित रक्तसंकलन होते. पण अद्यापही अनेक कंपन्या पूर्णवेळ सुरू झाल्या नाहीत. त्याचा फटका रक्तदान शिबिरांना बसत आहे.

  • औद्योगिक वसाहतींमधून होणाऱ्या रक्तदान शिबिरांना सध्या प्रतिसाद मिळत आहे. पण, तेथेही केवळ मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत शिबिरे नियोजित आहेत.

  • रक्तदानात महाविद्यालयांचे नेहमीच योगदान असते. मात्र, सध्या उन्हाळ्याच्या सुट्या असल्याने महाविद्यालये व विद्यापीठे बंद असल्याने शिबिरांची संख्या कमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT