rajiv satav esakal
पुणे

सातव यांना पोस्ट कोविड न्यूमोनिया; रुग्णालयाचं स्पष्टीकरण

सातव यांची कोरोनाची आरटी-पीसीआर निदान चाचणी रविवारी (ता.९) निगेटिव्ह आली होती.

सम्राट कदम : सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासदार राजीव सातव (MP Rajiv Satav) यांचे पुण्यात रविवारी पहाटे जहांगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. तसेच त्यांना सेकंडरी न्यूमोनिया आणि मल्टी ऑर्गन फेल्यूअर सिंड्रोम होता, अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सत्यजित गिल (Dr. Satyajeet Gil) यांनी दिली. (Post covid pneumonia to MP Satav Explanation doctor at Jehangir Hospital)

सातव यांची कोरोनाची आरटी-पीसीआर निदान चाचणी रविवारी (ता.९) निगेटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांचे न्युमोनियासंबंधीचे निदान झाले. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की,‘‘सातव यांच्यावर करोना आजारावर उपचार सुरू होते. काही दिवसात त्यांच्या कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह देखील आला होता. मात्र, त्याचदरम्यान त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. त्यातून ते लवकरात बरे, व्हावे यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास निधन झालं’’ सातव यांना याच काळात सायटोमॅजिलो या विषाणूचा संसर्ग झाल्याचेही टोपे यांनी माध्यमांना सांगितलं होतं.

सायटोमॅजिलो विषाणू काय आहे?

डीएनए प्रकारातील हा विषाणू सर्वसाधारण लोकांमध्ये आढळतो. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तीमध्ये याचे परिणाम जाणवू लागतात. अमेरिकेमध्ये ४० वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्याहून अधिक व्यक्तींच्या शरिरात हा विषाणू आढळून येतो. लाळ किंवा शरीरातील इतर द्रवाच्या माध्यमातून हा प्रसरतो. सायटॉमॅजिलो हा विषाणू लहान मुले आणि गरोदर महिलांमध्येही आढळून येतो.

सायटोमॅजिलोचा प्रसार, लक्षणं आणि निदान

सायटोमॅझिलो विषाणूचा प्रसार बाधित व्यक्तीची लाळ, थुंकी, रक्त, मूत्र, मातेच्या दुधातून होतो. तर डोकेदुखी, श्वास घेताना अडचण, ताप, सुजलेल्या ग्रंथी अशी याची लक्षण आहेत. रक्ताच्या चाचणीद्वारे या विषाणूचा शरिरातील अस्तित्वाचा शोध घेता येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT